Mahabreaking

🔴 BREAKING
Villagers aggressive :दुसरबीडमध्ये पाणी, गटारी व रस्त्यांच्या प्रश्नावर ग्रामस्थ आक्रमक Digambar Lokhande :जिल्हा परिषद शाळेमधूनच अधिकारी तयार होतात:   दिगंबर लोखंडे     22-Year-Old Man :जलतरण तलावामध्ये  22 वर्षीय तरुणाचा बुडाल्याने मृत्यू Maharashtra Provincial Tailik Mahasabha :महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, बुलढाणा जिल्हा कार्यकारिणी जाहीर Two Accused in Robbery Case :जबरी चोरीतील दोन आरोपी गजाआड; रोख रक्कम,दुचाकीसह १.४७ लाखांचा एवज जप्त Wife Murdered :यावलखेडमध्ये कौटुंबिक वादातून पत्नीचा चाकूने केला खून; आरोपी पतीला अवघ्या तासाभरात अटक Villagers aggressive :दुसरबीडमध्ये पाणी, गटारी व रस्त्यांच्या प्रश्नावर ग्रामस्थ आक्रमक Digambar Lokhande :जिल्हा परिषद शाळेमधूनच अधिकारी तयार होतात:   दिगंबर लोखंडे     22-Year-Old Man :जलतरण तलावामध्ये  22 वर्षीय तरुणाचा बुडाल्याने मृत्यू Maharashtra Provincial Tailik Mahasabha :महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, बुलढाणा जिल्हा कार्यकारिणी जाहीर Two Accused in Robbery Case :जबरी चोरीतील दोन आरोपी गजाआड; रोख रक्कम,दुचाकीसह १.४७ लाखांचा एवज जप्त Wife Murdered :यावलखेडमध्ये कौटुंबिक वादातून पत्नीचा चाकूने केला खून; आरोपी पतीला अवघ्या तासाभरात अटक

Two Accused in Robbery Case :जबरी चोरीतील दोन आरोपी गजाआड; रोख रक्कम,दुचाकीसह १.४७ लाखांचा एवज जप्त

Two Accused in Robbery Case : दुचाकीने जात असलेल्या एकाला चाकूचा धाक दाखवून मोबाईलसह ३० हजार १८० रुपयांचा एवज लुटला होता. ही घटना  ०७ एप्रिल रोजी रात्री ११/३० वा चे दरम्यान घडली होती. या प्रकरणी खदान पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. तसेच त्यांच्याकडून एक लाख ४७ हजारांचा एवज जप्त केला.

Two Accused in Robbery Case

खदान पोलिसांची धडाकेबाज कारवाई; फोन पे द्वारे भरायला लावले सिगारेटचे बिल

संजय तायडे 

अकोला : दुचाकीने जात असलेल्या एकाला चाकूचा धाक दाखवून मोबाईलसह ३० हजार १८० रुपयांचा एवज लुटला होता. ही घटना  ०७ एप्रिल रोजी रात्री ११/३० वा चे दरम्यान घडली होती. या प्रकरणी खदान पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. तसेच त्यांच्याकडून एक लाख ४७ हजारांचा एवज जप्त केला.

फिर्यादी युवक दुचाकीने घरी जात असतांना आरोपी   अभिजित रामेश्वर हिंगणे रा. गायत्रीनगर अकोला व अमित पवण गवळी रा मलकापुर अकोला यांनी त्याला तुकाराम चौकात थांबवुन  मलकापुर रोड लगत असलेल्या खुल्या जागेमध्ये नेले. तेथे फिर्यादी यास लोखंडी चाकुचा धाक दाखवुन, फिर्यादीचे डोक्यावर लोखंडी चाकुचे मुठेने वार करून जखमी केले व फिर्यादीचे खिशातुन   फिर्यादीचा विवो कंपणीचा मोबाईल किंमत २५,०००/- रू , नगदी ५०००/- रूपये व फोन पे व्दारे सिगारेट बिल १८०/- रू जबरदस्तीने भरण्यास भाग पाडुन एकुण ३०,१८०/- रू चा मुद्देमाल जबरदस्तीने हीसकावुन घेवुन पळून गेला होता. या प्रकरणी खदान पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या  गुन्हयाचा तपास करीत असतांना मिळालेल्या गुप्त बातमी वरून आरोपी नामे अभिजित रामेश्वर हिंगणे वय २९ वर्षे रा. गायत्रीनगर अकोला याचा शोध घेवुन अटक करून जबरी चोरीचे संबंधाने सखोल चौकशी केली असता, नमुद आरोपीने त्याचे साथीदार अमित गवळी याचेसह सदर जबरी चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. गुन्हयाचे तपासात आरोपीचे ताब्यातुन अंगझडतीत मिळालेले १) नगदी २,०००/- रूपये, २) फिर्यादीचा विवो कंपणीचा टी ४ कंपणीचा किंमत २५,०००/- रू चा मोबाईल तसेच गुन्हात वापरलेले वाहण ३) एक काळया रंगाची रॉयल इनफिल्ड कंपणीची बिना नंबर प्लेटची मोटार सायकल किं.अं. १,२०,०००/- असा एकुण १,४७,०००/-रूपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई   अर्चित चांडक, पोलीस अधिक्षक सा अकोला,  अपर पोलीस अधिक्षक रेड्डी, सुदर्शन पाटील सा. उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अकोला यांचे मार्गदशनाखाली  मनोज केदारे, पोलीस निरीक्षक पोस्टे खदान पोहेका / निलेश खंडारे, पोहेकॉ / अमित दुबे, पोकॉ/संदिप काटकर, पोकॉ/भुषण मोरे, पोहेकॉ/गिरीष विर सहा. फौ / संजय वानखडे, पोकॉ/गजानन टाले, पोकॉ/अभिमन्यु सदांशिव, पोकॉ वैभव कस्तुरे, पोकॉ/रोहीत पवार पोलीस स्टेशन खदान अकोला यांनी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top