Mahabreaking

[breaking_news]

Thrilling Wrestling :देऊळगाव महीत गुढीपाडव्याला कुस्त्यांचा थरार; पवन दहिया–सागर कोल्हेची लढत अनिर्णित

Thrilling Wrestling :गुढीपाडवा चैत्रोत्सवानिमित्त नंदी महादेव संस्थान टेकडीवर पारंपरिक कुस्त्यांची भव्य दंगल मोठ्या उत्साहात पार पडली. राज्यासह देशाच्या विविध भागांतून आलेल्या नामवंत मल्लांनी दमदार खेळ सादर करत कुस्तीप्रेमींना थरारक सामने अनुभवायला दिले.

 Thrilling Wrestling

चैत्रोत्सवात रंगला कुस्तीफड; तीन लाखांच्या बक्षिसांनी मल्लांची झुंज गाजली

विठ्ठल पान्नासे

देऊळगाव मही : गुढीपाडवा चैत्रोत्सवानिमित्त नंदी महादेव संस्थान टेकडीवर पारंपरिक कुस्त्यांची भव्य दंगल मोठ्या उत्साहात पार पडली. राज्यासह देशाच्या विविध भागांतून आलेल्या नामवंत मल्लांनी दमदार खेळ सादर करत कुस्तीप्रेमींना थरारक सामने अनुभवायला दिले.

देऊळगाव मही येथील आखाड्याची ख्याती राज्याबरोबरच दिल्ली व हरियाणापर्यंत पोहोचल्याचे या दंगलीतून पुन्हा अधोरेखित झाले. अंतिम व मानाची कुस्ती हरियाणाच्या पवन दहिया आणि नगरच्या सागर कोल्हे यांच्यात रंगली. लाल मातीत झालेल्या या चुरशीच्या लढतीत दोन्ही मल्लांनी उत्कृष्ट डावपेच दाखवत प्रेक्षकांची मने जिंकली. दीर्घकाळ रंगलेल्या या झुंजीत कोणताही निर्णायक निकाल लागला नसल्याने पंच समितीने कुस्ती अनिर्णित घोषित केली. दोन्ही मल्लांना १५ हजार रुपयांचे बक्षीस समसमान देण्यात आले.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गावाची परंपरा जपत आयोजित करण्यात आलेल्या या दंगलीत विदर्भ, मराठवाडा, मध्यप्रदेश, दिल्ली व हरियाणा येथील मल्लांनी सहभाग घेतला. सुमारे तीन लाख रुपयांची जंगी बक्षिसे ठेवण्यात आल्याने स्पर्धेला अधिकच रंग चढला.

कार्यक्रमाचे उद्घाटन नारळ व अकरा रुपयांनी करण्यात आले. यावेळी शंकरदादा शिंगणे, एकनाथ बापू शिंगणे, गणेश शिंगणे, गणेश नागरे, सरपंच वसुदेव पाटील शिंगणे, माजी सरपंच उमेश शिंगणे, तंटामुक्ती अध्यक्ष भास्कर शिंगणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दंगल यशस्वी करण्यासाठी पंच समितीचे तुकाराम महाराज शिंगणे, शेख निसारशेठ, रवींद्र इंगळे, मन्नान पठाण, राजेंद्र शिंगणे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत पाटील यांनी केले. कुस्त्यांचा हा फड पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top