Mahabreaking

[breaking_news]

Three primary health centers :जिल्ह्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना ‘राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन’

Three primary health centers :सार्वजनिक आरोग्य सेवेची गुणवत्ता अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन’ पुरस्काराची यादी नुकतीच जाहीर झाली असून, यामध्ये राज्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. त्यापैकी तीन प्राथमिक आरोग्य केंद्रे बुलढाणा जिल्ह्यातील असल्याने जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेसाठी ही बाब अभिमानास्पद ठरली आहे.

Three primary health centers

किन्होळा, गणेशपुर व जानेफळचा गौरव; ना. प्रतापराव जाधव यांनी केले आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन

बुलढाणा : सार्वजनिक आरोग्य सेवेची गुणवत्ता अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन’ पुरस्काराची यादी नुकतीच जाहीर झाली असून, यामध्ये राज्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. त्यापैकी तीन प्राथमिक आरोग्य केंद्रे बुलढाणा जिल्ह्यातील असल्याने जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेसाठी ही बाब अभिमानास्पद ठरली आहे.

राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन प्राप्त करणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये चिखली तालुक्यातील किन्होळा, खामगाव तालुक्यातील गणेशपुर आणि मेहकर तालुक्यातील जानेफळ या प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. उर्वरित दोन प्राथमिक आरोग्य केंद्रे धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील दहिपाल व अनाळा येथील आहेत.

या मानांकनाबद्दल उत्कृष्ट आरोग्य सेवा देणाऱ्या सर्व डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांचे केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अभिनंदन केले आहे.

आरोग्य सेवांची गुणवत्ता तपासताना प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दिले जाणारे तातडीचे उपचार, रुग्ण रेफरलचे प्रमाण, प्रसूती सेवा, स्वच्छता, परिसर व्यवस्थापन, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांचा वापर, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती आदी बाबी केंद्रस्थानी ठेवून तपासणी करण्यात येते. 7 ते 18 जानेवारी 2026 या कालावधीत केंद्रीय परीक्षकांनी मुद्देनिहाय तपासणी करून अहवाल केंद्रीय समितीकडे सादर केला होता. त्यानंतर ही यादी जाहीर करण्यात आली.

आश्वासनास मिळाले यश

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी यापूर्वी बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात घेतलेल्या बैठकीत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय मानांकन मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते, नोडल अधिकारी तथा जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव, जिल्हा सार्वजनिक आरोग्य परिचारिका शितल साखळीकर, कार्यक्रम सहाय्यक अमर राठोड, जिल्हा हिवताप अधिकारी शिवराज चव्हाण यांनी मानांकन मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.

आरोग्य कर्मचाऱ्यांचे विशेष योगदान

राष्ट्रीय मानांकन प्राप्त करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी चिखली डॉ. ऋषिकेश कणखर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुराधा गारोडे व किन्होळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या चमूने विशेष परिश्रम घेतले. तसेच खामगाव तालुक्यातील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिलाष खंडारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. एस. तेलंग व गणेशपुर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या चमूने, तर मेहकर तालुक्यातील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय बलकार, वैद्यकीय अधिकारी डॉ. सूरज ठाकरे व जानेफळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या चमूने उल्लेखनीय कामगिरी बजावली.

तीन वर्षांसाठी तीन लाखांचे प्रोत्साहन अनुदान

या राष्ट्रीय मानांकनानंतर संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रांना तीन वर्षांसाठी दरवर्षी तीन लाख रुपये प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. या निधीतून रुग्णांसाठी सुविधा वाढविणे तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन स्वरूपात लाभ देण्यात येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top