Mahabreaking

🔴 BREAKING
Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला

Sakharkherda MP Cup :साखरखेर्डा खासदार चषक क्रिकेट स्पर्धा : प्रहार संघ विजेता

Sakharkherda MP Cup :शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त साखरखेर्डा येथे आयोजित खासदार चषक क्रिकेट स्पर्धेचा समारोप आज 30 जानेवारी रोजी बक्षीस वितरण सोहळ्याने झाला.

Sakharkherda MP Cup

ट्रॉफीऐवजी स्व. अजितदादा पवार यांची प्रतिमा देऊन वाहिली आदरांजली

साखरखेर्डा : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त साखरखेर्डा येथे आयोजित खासदार चषक क्रिकेट स्पर्धेचा समारोप आज 30 जानेवारी रोजी बक्षीस वितरण सोहळ्याने झाला.

स्पर्धेतील अंतिम सामना प्रहार संघ साखरखेर्डा व संविधान इलेव्हन संघ, जळगाव जामोद यांच्यात झाला. या सामन्यात प्रहार संघाने लिलया विजय मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. शिवसेना युवा नेते योगेश जाधव यांच्या हस्ते विजेत्या प्रहार संघाला १ लाख १ हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.

द्वितीय क्रमांकाचे ५१ हजार रुपयांचे पारितोषिक माजी सरपंच महेंद्र पाटील यांच्या हस्ते संविधान इलेव्हन संघाला देण्यात आले. तृतीय क्रमांकाचे ३१ हजार रुपयांचे पारितोषिक माजी सरपंच चंद्रशेखर शुक्ल यांच्या हस्ते आयांश इलेव्हन, साखरखेर्डा संघाला देण्यात आले. चतुर्थ क्रमांकाचे २१ हजार रुपयांचे पारितोषिक युवासेना तालुका प्रमुख संदीप मगर यांच्या हस्ते राजे छत्रपती व बजरंग संघाने स्वीकारले. तसेच उत्कृष्ट फलंदाजी, गोलंदाजी व उत्कृष्ट झेल यासाठी खेळाडूंना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली.

बक्षीस वितरण कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, अमृता योगेश जाधव, शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा सौ. मायाताई म्हस्के, माजी सरपंच सौ. पुनम महेंद्र पाटील, महेंद्र पाटील, कमलाकर गवई, चंद्रशेखर शुक्ल, दाऊद कुरेशी, शिवसेना नेते गंभीरराव खरात, युवासेना तालुका प्रमुख संदीप मगर, राताळीचे सरपंच समाधान पाटील, अरुण देशमुख, गोपालसिंग राजपूत, संतोष राजपूत, ग्रामसेवा सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष जीवनसिंग राजपूत, बाबा तिवारी, आदित्य काटे, प्रतिक तायडे, जावेद चौधरी, रफीक शेख तांबोळी, समाधान राजगुरू, दिलीप सोभागे, डी. एन. पांचाळ, अशोक इंगळे, अशोक खरात, सचिन खंडारे, देविदास सरकटे आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या अकाली अपघाती निधनामुळे अंतिम सामना सुरू होण्यापूर्वी सर्व खेळाडू व उपस्थितांनी दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली. बक्षीस वितरणावेळी यंदा ट्रॉफीऐवजी स्व. अजितदादा पवार यांची प्रतिमा प्रत्येक संघाला देत भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top