Mahabreaking

🔴 BREAKING
Driving test will be completely digital :ड्रायव्हिंग टेस्ट होणार पूर्णपणे डिजिटल! अकोला आरटीओत ‘ऑटोमेटेड टेस्ट ट्रॅक’ उभारणीला सुरुवात burglary attempt :बीबी येथे भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न फसला; घरातच बंदिस्त केलेल्या चोरट्याला पोलिसांनी पकडले sand smugglers :रेती तस्करांचा पाठलाग करत महसूल पथकाची धडक कारवाई; टिप्पर जप्त Shocking incident :दगडवाडी फाट्यावर धक्कादायक घटना; चार अज्ञातांनी इसमाला कारमध्ये बसवून लुटले Clashes over solar pump dispute :विहिरीवरील सोलार पंपाच्या वादातून हाणामारी; रोहना येथे सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल Buddhist communitys bride-groom introduction : बाळापूर येथे बौद्ध समाजाचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात; अकोला-वाशिममधून प्रतिसाद Driving test will be completely digital :ड्रायव्हिंग टेस्ट होणार पूर्णपणे डिजिटल! अकोला आरटीओत ‘ऑटोमेटेड टेस्ट ट्रॅक’ उभारणीला सुरुवात burglary attempt :बीबी येथे भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न फसला; घरातच बंदिस्त केलेल्या चोरट्याला पोलिसांनी पकडले sand smugglers :रेती तस्करांचा पाठलाग करत महसूल पथकाची धडक कारवाई; टिप्पर जप्त Shocking incident :दगडवाडी फाट्यावर धक्कादायक घटना; चार अज्ञातांनी इसमाला कारमध्ये बसवून लुटले Clashes over solar pump dispute :विहिरीवरील सोलार पंपाच्या वादातून हाणामारी; रोहना येथे सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल Buddhist communitys bride-groom introduction : बाळापूर येथे बौद्ध समाजाचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात; अकोला-वाशिममधून प्रतिसाद

criminals arrested :शेगावात घरफोडी करणारे तीन अट्टल गुन्हेगार जेरबंद, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

criminals arrested : शेगाव येथे घरफोडी करणाऱ्या तीन अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक करत मोठी कारवाई केली आहे. आरोपींकडून सोन्याचे दागिने, हुंडाई कार आणि मोबाईल असा एकूण ६ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून बुलढाणा जिल्ह्यातील एका आणि अकोला जिल्ह्यातील दोन घरफोड्यांच्या गुन्ह्यांची यशस्वी उकल झाली आहे.

Three hardened criminals

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धडाकेबाज कारवाई; तीन घरफोड्यांची यशस्वी उकल

बुलढाणा : शेगाव येथे घरफोडी करणाऱ्या तीन अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक करत मोठी कारवाई केली आहे. आरोपींकडून सोन्याचे दागिने, हुंडाई कार आणि मोबाईल असा एकूण ६ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून बुलढाणा जिल्ह्यातील एका आणि अकोला जिल्ह्यातील दोन घरफोड्यांच्या गुन्ह्यांची यशस्वी उकल झाली आहे.

जिल्ह्यात वाढत्या घरफोडीच्या घटनांची गंभीर दखल घेत निलेश तांबे (पोलीस अधीक्षक, बुलढाणा) यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सखोल तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथके तयार करून तपास सुरू करण्यात आला.

५ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान अज्ञात आरोपींनी फिर्यादी धीरजकुमार रामपाल सिंग (रा. बरेली, सध्या माऊलीनगर, शेगाव) यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून सोन्याचे ब्रासलेट, कानातील टॉप्स आणि एमएच-४९-सीएस-४९५६ क्रमांकाची हुंडाई कार असा एकूण ६ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास करत जालना जिल्ह्यातील परतूर व मंठा परिसरातून तीन आरोपींना शिताफीने अटक केली. पोलिसांनी राजेंद्र बाबासाहेब राऊत (वय २५, रा. सेलुरोड, परतूर, जि. जालना), राजेश शंकर शर्मा (वय ३०, रा. आनंदवाडी, मनमाड, ता. नांदगाव, जि. नाशिक), श्रीराम सोमनाथ सोनवणे (वय २०, रा. जातेगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांना अटक केली. त्यांच्याकडून  १६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रासलेट व टॉप्स – ₹६५हजार, हुंडाई कार – किंमत सहा लाख रुपये, मोबाईल फोन (३ नग) – ₹२१,००० असा  ६ लाख ८६ हजार रुपयांचा एवज त्यांच्याकडून जप्त केला.

तिघांवरही घरफोडी, चैन स्नॅचिंग, दरोड्याची तयारी, चोरी व मोटारसायकल चोरीसारखे अनेक गंभीर गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत नोंद आहेत. चौकशीत त्यांनी अकोला जिल्ह्यातील डाबकी रोड व खदान पोलीस ठाण्यातील दोन घरफोड्यांची कबुलीही दिली आहे.सध्या आरोपी न्यायालयीन आदेशाने पोलीस कोठडीत असून पुढील तपास शेगाव शहर पोलीस करीत आहेत.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या आदेशाने अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा (खामगाव) व अमोल गायकवाड (बुलढाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर, उपनिरीक्षक यशोदा कणसे, अविनाश जायभाये, पोहेकॉ, दिपक लेकुरवाळे, शेख चाँद, गणेश पाटील, पोकॉ गजानन गोरले, चापोकॉ. निवृत्ती पुंड नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा., तसेच पोहेको, राजू आडवे, पोकॉ, ऋषी खंडेराव तांत्रिक विष्लेषण विभाग, बुलढाणा यांच्या पथकाने केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top