Mahabreaking

[breaking_news]

Three Gas Cylinders Explode :हॉटेलातील तीन गॅस सिलिंडरचा स्फोट;  वृध्दासह दोन जण जखमी

Three Gas Cylinders Explode : शहरातील जलंब रस्त्यावरील हॉटेलात तीन गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने एका वृध्दासह दोन जण जखमी झाले. ही घटना 17 एप्रिल रोजी सायंकाळी घडली. सिलिंडरच्या स्फोटामुळे परिसरात मोठा आवाज झाला होता. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या आगीत एका युवकाची दुचाकीही जळाली.

Three Gas Cylinders Explode

खामगाव शहरातील जलंब रस्त्यावरील घटना ; हॉटेलचे मोठे नुकसान

खामगाव: शहरातील जलंब रस्त्यावरील हॉटेलात तीन गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने एका वृध्दासह दोन जण जखमी झाले. ही घटना 17 एप्रिल रोजी सायंकाळी घडली. सिलिंडरच्या स्फोटामुळे परिसरात मोठा आवाज झाला होता. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या आगीत एका युवकाची दुचाकीही जळाली.

खामगाव शहरातील जलंब रस्त्यावर असलेल्या वाडी परिसरातील एका हॉटेलात  एकापाठोपाठ तीन गॅस सिलींडरचा स्फोट झाला. या स्फोटात अरुण अनोकार (वय ७२), हे शिवणकाम करणारे कारागीर गंभीररीत्या भाजले. आग लागल्याच्या वेळी ते दुकानातील ग्राहकांचे कपडे आणण्यासाठी आत गेले होते. त्याचवेळी शेजारील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेली कादंबरी किरण आचार्य (वय १९) ही स्फोटाच्या धक्क्यामुळे खाली कोसळली. तिच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली आहे.दोन्ही जखमींना तातडीने  खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संबंधित हॉटेल अरुण कोलते यांच्या मालकीचे असल्याचे समजते. स्फोटामुळे हॉटेलमधील साहित्याचे मोठे नुकसान झाले असून हिमांशू नाहर या युवकाची दुचाकी देखील जळाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top