Mahabreaking

[breaking_news]

Thieves on the rampage :देऊळगाव मही शिवारात चोरट्यांचा धुमाकूळ; कोंबड्यांसह शेती साहित्य लंपास

Thieves on the rampage : देऊळगाव मही शिवारातील एका शेतकऱ्याच्या टिनशेड व कुक्कुटपालन केंद्रावर अज्ञात चोरट्यांनी धाड टाकत खताच्या पोत्यांपासून कोंबड्या, गहू, शेती अवजारे आणि चार्जिंग पंप असा सुमारे २९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ciber
टिनशेडचे कुलूप तोडून चोरी; खत, गहू, कुक्कुटपालन साहित्यावर चोरट्यांचा डल्ला

गजानन तिडके 
देऊळगाव राजा : देऊळगाव मही शिवारातील एका शेतकऱ्याच्या टिनशेड व कुक्कुटपालन केंद्रावर अज्ञात चोरट्यांनी धाड टाकत खताच्या पोत्यांपासून कोंबड्या, गहू, शेती अवजारे आणि चार्जिंग पंप असा सुमारे २९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विजय उत्तम शिंगणे (वय ४४, व्यवसाय – शेती, रा. देऊळगाव मही, ता. देऊळगाव राजा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ही चोरी २५ जुलै रोजी सायंकाळी ५ ते २६ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजेदरम्यान देऊळगाव मही शिवारात घडली.
चोरट्यांनी फिर्यादी तसेच साक्षीदार संतोष अशोक शिंगणे यांच्या टिनशेड व कुक्कुटपालन केंद्राचे कुलूप आणि लोखंडी तार तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर तेथील ५० किलो वजनाच्या खताच्या पाच पोत्यांसह दोन क्विंटल गहू, विविध शेती अवजारे, लहान-मोठ्या सुमारे ३० ते ३५ कोंबड्या आणि एक चार्जिंग पंप असा एकूण २९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि कुक्कुटपालन व्यावसायिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. शेतीसाठी आवश्यक साहित्य आणि कुक्कुटपालनातील पक्ष्यांची चोरी झाल्याने फिर्यादीचे आर्थिक नुकसान झाले आहे.
या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) आणि ३३४(१) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस हेड कॉन्स्टेबल काकड यांनी फिर्याद नोंदविली असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कलीम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, घटनास्थळ परिसरातील संशयित हालचालींची माहिती, तसेच उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलीसांकडून सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top