Thieves Active in Dongav : पोलीस स्टेशन हद्दीत गत काही दिवसांपासून चोरट्यांचा हैदोस सुरू आहे. चोरटे शेतातील साहित्य लंपास करीत असल्याचे चित्र आहे. शेलगाव देशमुख शिवारात अज्ञात चोरट्यांनी शेतातील विविध शेती साहित्य चोरी करून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत तब्बल २३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला असून, परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कांदा पिकाच्या शेतावर चोरट्यांचा डल्ला; झटका मशीन, केबल आणि पितळी तोट्या चोरीला
डोणगाव : पोलीस स्टेशन हद्दीत गत काही दिवसांपासून चोरट्यांचा हैदोस सुरू आहे. चोरटे शेतातील साहित्य लंपास करीत असल्याचे चित्र आहे. शेलगाव देशमुख शिवारात अज्ञात चोरट्यांनी शेतातील विविध शेती साहित्य चोरी करून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत तब्बल २३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला असून, परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी वसीम अहमद खान हसन शेर खान (वय ४६, रा. डोणगाव) यांची क-हाळवाडी शिवारातील गट क्रमांक ३६६/१ मध्ये सुमारे ८ एकर शेती आहे. त्यांनी अर्ध्या एकरावर कांदा लागवड केली असून पिकाला पाणी देण्यासाठी स्प्रिंकलर यंत्रणा तसेच सुरक्षेसाठी झटका मशीन बसवले होते.
दि. ३ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास वसीम खान यांनी शेतातील झटका मशीन सुरू करून घरी परतले. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता ते शेतात आले असता, झटका मशीन व बॅटरी जागेवर नसल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी अधिक पाहणी केली असता, कांदा पिकाला बसविलेल्या स्प्रिंकलरच्या १० पितळी तोट्या तसेच विहिरीवरील सोलर पंपाला जोडलेला १०० मीटर तांब्याचा केबलही चोरीला गेल्याचे आढळले.चोरीस गेलेल्या साहित्यामध्ये झटका मशीन व बॅटरीची अंदाजे किंमत ११ हजार रुपये, १० पितळी तोट्यांची किंमत २ हजार ५०० रुपये तर १०० मीटर तांब्याच्या केबलची किंमत १० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी वसीम खान यांनी ६ मे रोजी डोणगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अंतर्गत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.दरम्यान, शेती साहित्य चोरीच्या वाढत्या घटनांमुळे परिसरातील शेतकरी चिंतेत असून, ग्रामीण भागात रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
कोठ्याचे कुलूप तोडून ३० क्विंटल हळदीचे बेणे लंपास
डोणगाव शिवारामध्ये एका कोठयाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ९० हजार रुपये किमतीचे ३० क्विंटल हळदीचे बेणे चोरून नेल्याची घटना ५ मे रोजी उघडकीस आली. या प्रकरणी विठ्ठल विश्वनाथ भुतेकर रा. डोणगाव यांच्या तक्रारीवरून डोणगाव पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी विठ्ठल विश्वनाथ भुतेकर (वय ४४, रा. डोणगाव) यांनी पेरणीसाठी राजेश रमेश सावजी यांच्या मालकीचे डोणगाव येथील कोठयामध्ये त्यांनी विकत आणलेले ३० क्विंटल हळदीचे बेणे साठवून ठेवले होते. ४ मे रोजी सायंकाळी ६ वाजेपासून ते ५ मे रोजी पहाटे ५:३० वाजेच्या दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी कोठाराला लावलेले कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी कोठारातील ३,००० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे एकूण ९० हजार रुपये किमतीचे ३० क्विंटल हळदीचे बेणे लंपास केले.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

