Mahabreaking

[breaking_news]

Thief who broke into ATM arrested :एटीएम फोडणारा चोरटा इंदौरमधून जेरबंद; ईर्टिगा वाहनासह ५.०५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Thief who broke into ATM arrested : मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धानोरा येथील महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अवघ्या २४ तासांत मध्यप्रदेशातील इंदौर येथून जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. आरोपीकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली मारुती ईर्टिगा कार आणि मोबाईल असा एकूण ५ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Thief who broke into ATM arrested

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई ;  २४ तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या

गजानन तिडके

बुलढाणा : मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धानोरा येथील महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अवघ्या २४ तासांत मध्यप्रदेशातील इंदौर येथून जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. आरोपीकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली मारुती ईर्टिगा कार आणि मोबाईल असा एकूण ५ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जून रोजी पहाटे ३.३६ वाजताच्या सुमारास धानोरा येथील महाराष्ट्र बँकेच्या एटीएममध्ये दोन अज्ञात इसमांनी तोंडाला रुमाल बांधून प्रवेश केला. त्यांच्या हातात लोखंडी रॉड होते. आरोपींनी एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करत मशीनचे नुकसान केले. याप्रकरणी फिर्यादी महेश कैलास बुरसे (वय २९, रा. पुसेगाव, ता. सेनगाव, सध्या गजानन नगरी, मलकापूर) यांच्या तक्रारीवरून मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक आशिष रोही यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथके तयार करून समांतर तपास सुरू करण्यात आला.

तपासादरम्यान १६ जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की, एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारे आरोपी इंदौर (मध्यप्रदेश) येथील असून ते पळून जाण्याच्या तयारीत आहेत. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने इंदौर गाठून अत्यंत शिताफीने कारवाई करत जावेद अयुब खान (वय ३८, रा. कबुतरखाना, इंदौर, मध्यप्रदेश) याला ताब्यात घेतले. पोलिसी चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली मारुती ईर्टिगा (क्र. एमपी-०९-डब्ल्यूबी-३२३७) किंमत ५ लाख रुपये तसेच एक मोबाईल फोन किंमत ५ हजार रुपये असा एकूण ५ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुढील कारवाईसाठी मलकापूर ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून गुन्ह्यातील दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. तसेच या टोळीने इतर ठिकाणी अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचाही तपास पोलीस करीत आहेत.

ही उल्लेखनीय कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा व अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष रोही, पोलीस उपनिरीक्षक अविनाश जायभाये, पोहेकॉ. शेख चाँद, गणेश पाटील, पुरुषोत्तम आघाव, गजानन गोरले, वैभव मगर, शिवानंद हेलगे तसेच तांत्रिक विश्लेषण विभागातील राजू आडवे आणि ऋषीकेश खंडेराव यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top