Mahabreaking

[breaking_news]

Theft of Copper Cables :मेघा इंजिनिअरिंगच्या सोलार गोडाऊनमधील कॉपर केबल चोरीचा १२ तासांत उलगडा

Theft of Copper Cables : बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जलालाबाद येथे असलेल्या मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रा लि.च्या सोलार प्लांट इन्स्टॉलेशन गोडाऊनमधून चोरीस गेलेल्या महागड्या कॉपर केबल प्रकरणाचा अकोला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या १२ तासांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी ७ लाख ५० हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Theft of Copper Cables

अकोला एलसीबीची धडाकेबाज कारवाई; २ आरोपी अटकेत, ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

अकोला : बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जलालाबाद येथे असलेल्या मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रा लि.च्या सोलार प्लांट इन्स्टॉलेशन गोडाऊनमधून चोरीस गेलेल्या महागड्या कॉपर केबल प्रकरणाचा अकोला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या १२ तासांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी ७ लाख ५० हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ मार्च २०२६ रोजी जलालाबाद (ता. बार्शीटाकळी) येथील मेघा इंजिनिअरिंगच्या सोलार प्लांट गोडाऊनमधून ७० स्क्वेअर एमएमची मोठी अर्थिंग केबल (किंमत ६.५० लाख रुपये) तसेच ४ स्क्वेअर एमएमची डीसी केबल (किंमत २.२५ लाख रुपये) असा एकूण ८.७५ लाख रुपयांचा कॉपर केबल साठा अज्ञात चोरट्यांनी लंपास केला होता. याप्रकरणी बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २७०/२०२६ कलम ३०५(अ) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना तातडीने गुन्ह्याचा उलगडा करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार एलसीबी पथकाने समांतर तपास सुरू केला. तांत्रिक माहिती व चौकशीदरम्यान गोडाऊनमध्ये काम करणारा संदीप उमेश राय (वय २७, रा. सारीपुर, जि. बक्सर, बिहार) याने चोरीतील केबल विकल्याचे निष्पन्न झाले. अधिक चौकशीत त्याने हा माल शहेजाद बेग सलीम बेग (वय ३२, रा. बादशाह नगर, पातूर) याला विकल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी पातूर येथे छापा टाकून चोरीतील ७० स्क्वेअर एमएमची अर्थिंग केबल, दोन पॅकिंग असलेले डीसी केबल ड्रम आणि पाच रिकामे ड्रम असा एकूण ७.५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी बार्शीटाकळी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बालू पवार हे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोउपनि गोपाल जाधव, ग्रेड पोउपनि दशरथ बोरकर, सफी, गणेश पांडे, गोकुळ चव्हाण, उमेश परावे, अन्सार शेख, स्वप्नील सखेडकर, आकाश मानकर तसेच चालक गणेश ठाकरे यांनी पार पाडली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top