Mahabreaking

[breaking_news]

Akshaya Tritiya :अक्षय तृतीयेनिमित्त शिंदी येथे रामलीला सोंगाची परंपरा कायम

Akshaya Tritiya : सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी येथे दिनांक १९ एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर गेल्या शेकडो वर्षापासून सुरू असलेली सोंगांची परंपरा यावर्षीही जपण्यात आली. यंदा सुद्धा गावकऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी रात्रभर सोंगाचे आयोजन करण्यात आले होते .

Akshaya Tritiya

साखरखेर्डा : सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी येथे दिनांक १९ एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर गेल्या शेकडो वर्षापासून सुरू असलेली सोंगांची परंपरा यावर्षीही जपण्यात आली. यंदा सुद्धा गावकऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी रात्रभर सोंगाचे आयोजन करण्यात आले होते .

१९ एप्रिल रोजी रात्रभर गावातील सोंग काढण्यात आले.  जुन्या परंपरेनुसार  बस स्थानकावर  मैदानावर रात्रभर महिला व पुरुष तसेच बालगोपाल जागरण करत सोंग पाहत होते.  सोंगामध्ये अनुक्रमे झाडझुडीचे नागेश काटकर ,  लिंबड्याचे कृष्णा गिरी , रामाचे विलास बेलोडे  , तर लक्ष्मणाचे ज्ञानेश्वर खरात , भस्मासुर विलास गावडे ,  रावण काशिनाथ बुरकुल  अगंद मारोती कैलास काळे ,  बंडू बंगाळे , महादेव पार्वती विनोद उर्फ पप्पू खरात व श्रीकांत बंगाळे , सीता पप्पू खरात ,  हिरण्यकश्यप सौरभ निकस , प्रल्हाद बाळ ऋषिकेश गुणेवाड,  डाकिन शिवाजी खरात , श्रावण बाळ उमेश बंगाळे ,  तर यावेळी वाघ्या मुरळीचे आयोजन शिवाजी खरात ,  आश्रुबा गवई  , यशवंता खंडारे , पंजाब मोरे यांनी केले होते .  सकाळी आईचे सोंग मनोहर खरात यांनी घेतले होते.  आईचे सोंग संपूर्ण गावातून मिरवण्यात आले असून यावेळी पुजा अर्चा आईच्या सोंगाची गावातील महिलांनी केली . शेवटी आईच्या सोंगाची व भोपे नितीन येरमुले , पप्पू खरात , बाबू मारके यांच्यात जवळपास दोन तास रंगीत तालीम झाली .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top