Mahabreaking

[breaking_news]

  The situation changed : क्षणात बदलले चित्र! मुसळधार पावसाने इसवीश्वर नाल्याला पूर; उभी चारचाकी गाडी वाहून गेली

The situation changed : पातूर तालुक्यातील देऊळगाव येथे अंत्यविधीसाठी आलेल्या पाहुण्याची चारचाकी गाडी अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात इसवीश्वर नाल्यात वाहून गेल्याची घटना शनिवारी सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास घडली.

  The situation changed

राहुल सोनोने

वाडेगाव : पातूर तालुक्यातील देऊळगाव येथे अंत्यविधीसाठी आलेल्या पाहुण्याची चारचाकी गाडी अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात इसवीश्वर नाल्यात वाहून गेल्याची घटना शनिवारी सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास घडली.

add

मिळालेल्या माहितीनुसार, सुकळी येथील दीपक विक्रम हातोले हे आपल्या कुटुंबातील सहा सदस्यांसह देऊळगाव येथे अंत्यविधीसाठी आले होते. त्यांनी आपली एमएच-३० बीडब्ल्यू-१९८९ क्रमांकाची चारचाकी गाडी इसवीश्वर नाल्यालगत मुख्य रस्त्याच्या कडेला उभी करून अंत्यविधीसाठी गेले.

त्यावेळी नाल्यात पाणी नव्हते. मात्र, काही वेळातच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे इसवीश्वर नाल्याला अचानक दुथडी भरून पूर आला. पुराच्या वेगवान प्रवाहात रस्त्यालगत उभी असलेली चारचाकी गाडी वाहून गेली. घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थांनी या घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण केले असून ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

add

वृत्त लिहिपर्यंत वाहनमालक दीपक हातोले हे पातूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करत होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पावसाळ्यात नाल्यालगत वाहने उभी करताना विशेष खबरदारी घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top