Mahabreaking

[breaking_news]

Shri Gurucharitra Parayan :डोणगाव येथील स्वामी समर्थ केंद्रात ‘श्री गुरुचरित्र पारायण’ सोहळ्यास प्रारंभ

Shri Gurucharitra Parayan : येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये श्री गुरुचरित्र पारायण आणि अखंड नामजप यज्ञ ने सप्ताहाचा ९ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला.

Shri Gurucharitra Parayan

डोणगाव :  येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये श्री गुरुचरित्र पारायण आणि अखंड नामजप यज्ञ ने सप्ताहाचा ९ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला.

या आध्यात्मिक सोहळ्यामुळे सध्या संपूर्ण डोणगाव परिसर भक्तीने आणि नामस्मरणाने दुमदुमून गेला असून भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. १५ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या सप्ताहात दररोज विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत. यामध्ये पहाटे ५ ते सकाळी ८ या वेळेत सामूहिक ‘श्री गुरुचरित्र पारायण वाचन केले जात आहे. त्यानंतर सकाळी ८ वाजता भूपाळी आरती, १०:३० वाजता नैवेद्य आरती आणि सायंकाळी ६ ते ७ या वेळेत विशेष आरती होत आहे. या सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी डोणगावसह परिसरातील ४०१ सेवेकऱ्यांनी पारायणात सहभाग नोंदवून आपली सेवा अर्पण केली. हा आध्यात्मिक सोहळा सेवेकऱ्यांच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. सप्ताहाची सांगता १५ एप्रिल रोजी अखंड नामजप यज्ञाने होणार आहे. डोणगावसह पंचक्रोशीतील जास्तीत जास्त स्वामी भक्तांनी या पारायण सोहळ्याचा आणि दर्शनाचा लाभघ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top