Mahabreaking

[breaking_news]

Four Students Achieve :गुणवत्तेचा ‘सवडद पॅटर्न’; नवोदय परीक्षेत चार विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश

Four Students Achieve :सवडद येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेने आपल्या गुणवत्तेची परंपरा कायम राखत यंदाही चार विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविले आहे. ग्रामीण भागातील शाळा असूनही सातत्यपूर्ण परिश्रम आणि दर्जेदार मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

Four Students Achieve

सवडद जि.प. शाळेची यशपरंपरा कायम; चार विद्यार्थी नवोदयमध्ये चमकले

साखरखेर्डा : सवडद येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेने आपल्या गुणवत्तेची परंपरा कायम राखत यंदाही चार विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविले आहे. ग्रामीण भागातील शाळा असूनही सातत्यपूर्ण परिश्रम आणि दर्जेदार मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

साखरखेर्डा आठवडी बाजारात मधमाशांचा हल्ला; २० जण जखमी, नागरिकांची धावपळ

दरवर्षी या शाळेतील विद्यार्थी नवोदय प्रवेश परीक्षेसाठी बसतात. यासाठी शिक्षक संदीप मुंडकुळे आणि रियाज सैय्यद यांनी विशेष मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक विष्णू ठोसरे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांची शैक्षणिक तयारी मजबूत करण्यात आली.

यंदा लोकेश गणेश पडोळे (९८.७५%), सुमित मधूकर खरात (९७.५०%), कु. शर्वरी दत्तात्रय पोंधे (९६.२५%) आणि श्रेयस आनंद सुखदाने (९३.७५%) यांनी उच्च गुण मिळवत गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा अधिक ठळक झाला आहे.

या शाळेत विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेपुरते नव्हे, तर गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर दिला जातो. नवोदय विद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी शिक्षक सातत्याने मेहनत घेतात. याच प्रयत्नांचा परिपाक म्हणून दरवर्षी चांगले निकाल लागतात. मागील वर्षी तब्बल नऊ विद्यार्थी नवोदयसाठी पात्र ठरले होते.

यशाची परंपरा टिकवण्यासाठी शिक्षक प्रभाकर धुळे, रमेश जैवळ, अरुण गवई, सदानंद वानखेडे, संदीप मांटे, विठ्ठल काकडे आणि दिलीप तुपकर हे सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे सवडद शाळा ग्रामीण शिक्षणातील आदर्श ठरत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top