Mahabreaking

🔴 BREAKING
Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला

  Woman Blackmailed :सायबर विकृतीचा कळस!  फोटो व्हायरलची धमकी देत महिलेला केले ब्लॅकमेल

Woman Blackmailed : मोबाईल हॅक करून व्हॉट्सअॅप आणि ई-मेलमधील खाजगी फोटो-व्हिडिओ हस्तगत करत एका ३५ वर्षीय विवाहित महिलेचा दीर्घकाळ मानसिक छळ केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने महिलेवर दबाव टाकत व्हिडिओ कॉलवर अश्लील कृत्य करण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सोनाळा पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यासह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  Woman Blackmailed

व्हिडीओ कॉलवर अश्लील कृत्य करण्यास पाडले भाग, सोनाळ्यातील सायबर गुन्ह्याने जिल्ह्यात खळबळ

संग्रामपूर : मोबाईल हॅक करून व्हॉट्सअॅप आणि ई-मेलमधील खाजगी फोटो-व्हिडिओ हस्तगत करत एका ३५ वर्षीय विवाहित महिलेचा दीर्घकाळ मानसिक छळ केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने महिलेवर दबाव टाकत व्हिडिओ कॉलवर अश्लील कृत्य करण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सोनाळा पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यासह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाळा येथील ३५ वर्षीय महिलेनं दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध कायमी दखलपात्र अपराध क्रमांक ६७/२०२६ नोंदविण्यात आला आहे. हा छळाचा प्रकार तब्बल दोन वर्षांहून अधिक काळ म्हणजे १२ डिसेंबर २०२३ ते १० मार्च २०२६ या कालावधीत सुरू असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तक्रारीनुसार, आरोपीने फिर्यादीचा मोबाईल हॅक करून तिच्या व्हॉट्सअॅप व ई-मेलमधील खाजगी फोटो, संदेश आणि व्हिडिओ मिळवले. त्यानंतर हे फोटो तिच्या पती व नातेवाईकांना पाठवून बदनामी करण्याची धमकी देत आरोपीने तिला वारंवार फोनवर बोलण्यास भाग पाडले. “माझ्याशी बोलत राहा, नाहीतर तुझे फोटो गावात व नातेवाईकांमध्ये व्हायरल करीन,” अशी धमकी देऊन आरोपीने महिलेवर मानसिक दबाव आणल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

इतकेच नव्हे तर आरोपीने महिलेच्या संमतीविरुद्ध तिला अनेकवेळा व्हिडिओ कॉलवर कपडे काढण्यास भाग पाडले. त्या वेळी त्याने गुप्तपणे स्क्रीन रेकॉर्डिंग करून ते व्हिडिओ फिर्यादी व तिच्या बहिणीला पाठवल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच आरोपीने महिलेचा प्रत्यक्ष तसेच मोबाईलद्वारे वारंवार पाठलाग करत तिच्या पती, बहीण व इतर नातेवाईकांना फोन करून शिवीगाळ व धमक्या दिल्याचेही समोर आले आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ७५(१), ७५(२), ७७, ७८, ३५२, ३५१(२), ३५१(३), ३५६(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६(ई) व ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्हा पोलीस हवालदार मोहनसिंग अशोक पवार यांनी दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप अंबादास काळे करीत आहेत. या धक्कादायक सायबर गुन्ह्यामुळे सोनाळा परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top