Mahabreaking

[breaking_news]

Samadhan Shingne :छत्रपती ग्रामीण पतसंस्थेचा कामगिरीचा वाढता आलेख – समाधान शिंगणे

Samadhan Shingne :छत्रपती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था ही परिसरातील सर्वसामान्य नागरिकांसह लघु व मध्यम उद्योग-व्यवसायांसाठी कर्जपुरवठा करण्यात अग्रेसर असून मुदत ठेवींच्या बाबतीतही संस्थेने भक्कम स्थान निर्माण केले आहे.

Samadhan Shingne

गजानन भालेकर
देऊळगाव मही : छत्रपती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था ही परिसरातील सर्वसामान्य नागरिकांसह लघु व मध्यम उद्योग-व्यवसायांसाठी कर्जपुरवठा करण्यात अग्रेसर असून मुदत ठेवींच्या बाबतीतही संस्थेने भक्कम स्थान निर्माण केले आहे.छत्रपती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या सन २०२६ च्या दिनदर्शिकेचे विमोचन संस्थापक अध्यक्ष समाधान भिकाजी शिंगणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना शिंगणे म्हणाले की, या दिनदर्शिकेत पतसंस्थेच्या विविध सुविधा तसेच महामानवांच्या जयंती व पुण्यतिथींची सविस्तर व सुबक मांडणी करण्यात आली आहे. छत्रपती अर्बन पतसंस्थेचा कामगिरीचा आलेख सातत्याने उंचावत असून संस्था लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली असल्याचेही त्यांनी आपल्या मनोगतात नमूद केले.

कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भिकाजी सखाराम शिंगणे, बी. एम. पठाण, सिद्धीकशेठ कुरेशी, माजी सभापती नितीन शिंगणे, राष्ट्रवादी नेते एकनाथबाप्पू शिंगणे, मन्नान पठाण, खडकपूर्णा अर्बनचे अध्यक्ष संजुदादा शिंगणे, शेख फरहाद, रतन रेशवाल, सय्यद सईद, पतसंस्थेचे उपाध्यक्ष पंढरीनाथ कुटे, रामकिसन म्हस्के, माजी सरपंच सुभाष शिंगणे, सरपंच वसुदेव पाटील शिंगणे, उपसरपंच धर्मराज खिल्लारे, मोहम्मद कलीम, युवा नेते शेख नाजीम, भगवान शिंगणे, उमेश शिंगणे, सुनीलभाऊ मोरे, भास्कर शिंगणे, असगर कुरेशी, अनिरुद्ध शिंगणे, वसंतराव शिंगणे, बबन राऊत, पुरुषोत्तम खंदारकर, सुभाष इंगळे, शिवानंद कुटे, सुनील महाराज शिंगणे, राम पऱ्हाड, अशोक पाबळे, अनिल शिंगणे, संतोष जाधव, विशाल उबरहंडे, फरिद कुरेशी, उद्धव बनसोडे, व्यवस्थापक पुरुषोत्तम शिंगणे, नितीन खिल्लारे, रघु शिंगणे, संतोष चेके, रवींद्र पान्नासे, अमोल गुरव, महेंद्र झिने यांच्यासह अनेक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top