Mahabreaking

🔴 BREAKING
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर

ban on nylon kite string :नायलॉन मांजावर कायमस्वरूपी बंदी; बुलढाण्यात निर्मिती, विक्री व वापरास मनाई

ban on nylon kite string : मकर संक्रांतीच्या कालावधीत पतंग उडविण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. मात्र यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजामुळे मानवी जीवितासह पशु-पक्ष्यांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण होत आहे. नायलॉन मांजामुळे जखमी होण्याच्या तसेच मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण (संरक्षण) अधिनियमाअंतर्गत संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात नायलॉन मांजाची निर्मिती, वापर, विक्री व साठवणूक यांवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी निर्गमित केले आहेत.

nylon kite string
बुलढाणा : मकर संक्रांतीच्या कालावधीत पतंग उडविण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. मात्र यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजामुळे मानवी जीवितासह पशु-पक्ष्यांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण होत आहे. नायलॉन मांजामुळे जखमी होण्याच्या तसेच मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण (संरक्षण) अधिनियमाअंतर्गत संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात नायलॉन मांजाची निर्मिती, वापर, विक्री व साठवणूक यांवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी निर्गमित केले आहेत.
या आदेशानुसार बुलढाणा जिल्ह्यातील सर्व घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी तसेच साठवणूकदारांना नायलॉन मांजाची विक्री व साठवणूक करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस विभागांनी स्वतंत्र पथके स्थापन करून आवश्यक ती कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेविरुद्ध पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ च्या कलम १५ अन्वये शिक्षेची तरतूद लागू राहील, असेही जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top