Mahabreaking

🔴 BREAKING
Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५ कोटी ,६४ लाख मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५ कोटी ,६४ लाख मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले

substation in Sakharkherda: साखरखेर्डा येथील वीज वितरण उपकेंद्रातील कार्यालय, निवासस्थानांची दयनीय अवस्था

substation in Sakharkherda: येथील ३३ केव्ही वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्राच्या परिसरातील शाखा अभियंता कार्यालय व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने पूर्णपणे जीर्ण अवस्थेत असून कोणत्याही क्षणी कोसळतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्षे उपकेंद्र क्षेत्राबाहेर भाड्याने राहावे लागत आहे.

substation in Sakharkherda

दोन्ही इमारती भग्नावस्थेत; कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न गंभीर

साखरखेर्डा : येथील ३३ केव्ही वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्राच्या परिसरातील शाखा अभियंता कार्यालय व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने पूर्णपणे जीर्ण अवस्थेत असून कोणत्याही क्षणी कोसळतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्षे उपकेंद्र क्षेत्राबाहेर भाड्याने राहावे लागत आहे.

खिडक्यांच्या तुटलेल्या काचा, नादुरुस्त खिडक्या-दरवाजे, गळून पडलेले प्लॅस्टर आणि पुरातन वास्तूसारखी पडझड– अशी स्थिती या निवासस्थानांची झाली आहे. मात्र कंपनीच्या अधिकारीवर्गाचे याकडे सातत्याने होणारे दुर्लक्ष नागरिकांमध्ये नाराजी निर्माण करणारे ठरत आहे. स्थानिकांचा सवाल असा की, ही भग्न इमारत जमीनदोस्त करून नव्याने बांधण्याऐवजी वीज कंपनी ती पुरातत्त्व विभागाप्रमाणे ‘वारसा जपते’ आहे काय?

 ४० वर्षांपूर्वीचे बांधकाम आज पूर्णपणे जीर्ण

१९८१–८२ या कालावधीत शेंदूर्जन रोडवर सुमारे ३ एकर जागेत तत्कालीन महाराष्ट्र राज्य वीज महामंडळाने ३३ केव्ही संकलन–वितरण केंद्र, कनिष्ठ अभियंता कार्यालय, कनिष्ठ अभियंता व मुख्य लाईनमनांसाठी दोन स्वतंत्र इमारती आणि लाइन स्टाफसाठी ८ निवासस्थाने असे बांधकाम केले. दोन मजली इमारती, कंपाऊंड व आवश्यक सुविधा अशा पूर्ण बांधकामासह १९८२–८३ मध्ये हे सबस्टेशन सुरु झाले. यातून साखरखेर्डा परिसरातील तब्बल ४०–४५ गावांना वीजपुरवठा केला जातो.

निकृष्ट बांधकामामुळे इमारतींची झपाट्याने पडझड

वास्तूचे बांधकाम सुरुवातीपासूनच निकृष्ट दर्जाचे असल्याने कर्मचाऱ्यांनी काही वर्षे वास्तव्य केल्यानंतरच ती खराब होऊ लागली. २० वर्षातच, म्हणजे २०१० मध्ये पहिली किरकोळ डागडुजी करण्यात आली. मात्र दोन वेळा दुरुस्ती करूनही इमारती पुन्हा खस्ता झाल्या. २०११–१२ मध्ये त्या संपूर्णपणे ढासळण्याच्या स्थितीत आल्याने कर्मचाऱ्यांना जीवितहानीची भीती निर्माण झाली आणि त्यांना नाईलाजाने निवासस्थान रिकामे करून खाजगी जागेत स्थलांतर करावे लागले. तेव्हापासून आजपर्यंत या निवासस्थानांची पुनर्बांधणीच झाली नाही.निवासस्थाने आजही भग्नावस्थेत उभी असली तरी वीज वितरण कंपनीकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

कंपनीच्या दुर्लक्षामुळे परिसरात अतिक्रमण वाढले

वीज वितरण कंपनीच्या जागेभोवती सर्व बाजूंनी अतिक्रमण वाढल्याची चर्चाही स्थानिकांमध्ये जोरात आहे. इतकेच नाही, तर काही वेळा वीज मंडळ कार्यालयात जाण्यासाठी रस्तादेखील उपलब्ध नसल्याच्या तक्रारी ग्राहकांनी केल्या आहेत.पूर्वी ग्रामपंचायतीने वीज कर्मचाऱ्यांसाठी तयार केलेला हातपंप, तसेच जनावरांसाठी बांधलेला मोठा हौद — हे दोन्हीही आता अचानक गायब झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांची जनावरे आणि जंगलात चरावयास जाणारे पशुधन याच हौदावर पाणी पित असत.

निवासस्थाने जमीनदोस्त करून नव्याने बांधावीत

निवासस्थाने केव्हाही कोसळतील अशी परिस्थिती असल्याने त्या तातडीने जमीनदोस्त करून कर्मचाऱ्यांसाठी नवीन निवासस्थाने उभारावीत, तसेच कंपनीच्या जागेवरील अतिक्रमण हटवून रीतसर मोजणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top