Mahabreaking

🔴 BREAKING
Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५ कोटी ,६४ लाख मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५ कोटी ,६४ लाख मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले

Malkapur depot driver’s : मलकापूर आगार बस चालकाचे जेष्ठ नागरिकांसोबत उद्धट वर्तन; कारवाईची मागणी

Malkapur depot driver’s : मलकापूर ते वझर सरकटे या बसवरील चालकाने जेष्ठ नागरिक प्रवाशासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी संबंधित चालकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काशिनाथ जाधव यांनी आगार व्यवस्थापकांकडे केली आहे.

Malkapur depot

अशोक इंगळे 

साखरखेर्डा : मलकापूर ते वझर सरकटे या बसवरील चालकाने जेष्ठ नागरिक प्रवाशासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी संबंधित चालकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काशिनाथ जाधव यांनी आगार व्यवस्थापकांकडे केली आहे.

२७ नोव्हेंबर रोजी काशिनाथ पुंडलिक जाधव हे साखरखेर्डा येथून एमएच १४ बीटी ४३५६ या वझर सरकटे–मलकापूर बसने चिखली येथे जाण्यासाठी बसस्थानकावर प्रतीक्षा करत होते. सुमारे दुपारी २.३० वाजता बस आल्यावर ते चढत असताना चालकाने एकेरी भाषेत बोलत त्यांच्याशी गैरवर्तन केले. “खाली उतरा, मागील बसने जा” असे म्हणून चालकाने अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप त्यांनी केला.

जाधव यांनी सांगितले की, बसमध्ये चढल्यानंतरही चालकाने इतर प्रवाशांशीही अरेरावीची भाषा वापरली. साखरखेर्डा ते चिखलीदरम्यान रस्त्यांची दयनीय अवस्था असून चालकाने काळजीपूर्वक वाहन चालवणे अपेक्षित असताना त्याने निष्काळजीपणे बस चालवून प्रवाशांना त्रास होईल असे वर्तन केले. खड्डे व गतिरोधकांवरून बस वारंवार उडत असल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणात अस्वस्थता जाणवत होती, असेही त्यांनी नमूद केले.

या सर्व प्रकारामुळे संबंधित निष्क्रिय व बेजबाबदार चालकावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जाधव यांनी आगार प्रमुखांकडे केली आहे. आगार प्रमुखांनी दखल न घेतल्यास परिवहनमंत्र्यांकडे लेखी तक्रार दाखल करू, असा इशाराही त्यांनी दिला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top