Prataprao Deshmukh : ‘शराब नही, दूध पियेंगे… मरीज नही, सशक्त बनेंगे’ या सामाजिक संदेशातून स्वर्गीय प्रतापराव देशमुख यांच्या संकल्पनेतून सन २००० मध्ये सुरू झालेला व्यसनमुक्त व सशक्त समाजनिर्मितीचा उपक्रम आज २०२५ पर्यंत अखंडपणे सुरू आहे. या उपक्रमाअंतर्गत यंदा गावाच्या शाश्वत विकासासाठी आणि समाजहितासाठी अतुलनीय कार्य करणाऱ्या गावातील पाच व्यक्तींना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

‘शराब नही, दूध पियेंगे’ उपक्रमाला २५ वर्षांचा सामाजिक वारसा
फकीरा पठाण
मलकापूर पांग्रा : ‘शराब नही, दूध पियेंगे… मरीज नही, सशक्त बनेंगे’ या सामाजिक संदेशातून स्वर्गीय प्रतापराव देशमुख यांच्या संकल्पनेतून सन २००० मध्ये सुरू झालेला व्यसनमुक्त व सशक्त समाजनिर्मितीचा उपक्रम आज २०२५ पर्यंत अखंडपणे सुरू आहे. या उपक्रमाअंतर्गत यंदा गावाच्या शाश्वत विकासासाठी आणि समाजहितासाठी अतुलनीय कार्य करणाऱ्या गावातील पाच व्यक्तींना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
स्व. प्रतापराव देशमुख व त्यांच्या मित्रमंडळींनी सुरू केलेल्या या आधुनिक आणि समाजप्रबोधनात्मक उपक्रमाला त्यांच्या निधनानंतर लहान बंधू प्रल्हाद देशमुख, अनघा देशमुख तसेच मित्रमंडळींनी पुढे नेले. त्यांच्या विचारांची ज्योत अखंड ठेवत ‘शराब नही, दूध पियेंगे… मरीज नही, सशक्त बनेंगे’ या कार्यक्रमाला वर्षानुवर्षे गावकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय तसेच शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गावातीलच पाच जणांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. वैद्यकीय क्षेत्रात तब्बल ३४ वर्षे सेवा देणारे, ‘कपड्याला खिसा नसलेला माणूस’ म्हणून ओळखले जाणारे डॉ. चंद्रकांत दाभेरे यांचा वैद्यकीय सेवेसाठी विशेष सन्मान करण्यात आला.
गावातील जातीय सलोखा अबाधित ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले पत्रकार फकीरा पठाण यांना ‘जातीय सलोखा’ स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
पत्रकारितेच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे गंगाराम उबाळे, प्रगतशील शेतकरी तुकाराम वी. पंखुळे तसेच शैक्षणिक क्षेत्रातील योगदानासाठी शिक्षक तुकाराम डिघोळे यांनाही स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी झोटिंगा येथील ह.भ.प. वाघ गुरुजी होते. प्रमुख मान्यवरांमध्ये मान्यवरांमध्ये साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड, गावचे सरपंचपती यादव टाले, गुलशेर खासाब, लोकजागर परिवाराचे प्रवीण गीते, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पहिली महिला सर्पमित्र वनिता बोराडे, माजी सरपंच साबीर खान पठाण, नाईकवाड सर, लोकमतचे पत्रकार अशोक इंगळे, सचिन खंदारे, प्रताप मोरे, पंचाळ सर, पत्रकार सरकटे सर, पवन मगर, गावातील तंटामुक्ती अध्यक्ष आरिफ मलिक, अकील ठेकेदार, माजी तंटामुक्ती अध्यक्ष महमूद यार खान, किशोर मिसाळ, भागवत देशमुख, परमेश्वर दानवे, डॉ. सुरेशजी डोडिया, डॉ. आघाव, डॉ. बोडके, डॉ. टाले, डॉ. आशिष दाभेरे, रफिक मास्टर, उद्धव देशमुख, अंकुश देशमुख, शरद साळवे, गजेंद्र देशमुख, उदावंत भाऊ, अॅड. लुकमान शेख, अॅड. वसीम शेख, अॅड. गावंडे, सुनील उगले, शरद साळवे, संतोष साळवे, ऋषिकेश आटोळे ,जावेद शेख, आयुब बाबा, शरद आटोळे, प्रवीण देशमुख, अमोल देशमुख, पवन दाभेरे, गायकवाड सर, बीट जमादार निवृत्ती पोफळे यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोरे सर यांनी प्रभावी शब्दांतून सूत्रसंचालन करत उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या शेवटी ‘शराब नही, दूध पियेंगे’ या संदेशासह दूध वितरण करण्यात आले व उपस्थितांचे आभार मानण्यात आले.स्वर्गीय प्रतापराव देशमुख यांच्या पश्चातही हा उपक्रम सातत्याने सुरू ठेवणाऱ्या आयोजकांचे सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

