Mahabreaking

[breaking_news]

message of de-addiction :मलकापूर पांग्रात व्यसनमुक्तीचा संदेश देत नववर्षाचे स्वागत

message of de-addiction : नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात न करता सामाजिक भान जपत, व्यसनमुक्त व सशक्त समाज उभारणीचा संकल्प घेऊन मलकापूर पांग्रा येथे गेल्या तब्बल २५ वर्षांपासून ‘शराब नही, दूध पियेंगे’ हा अभिनव उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. या गौरवशाली परंपरेनुसार ३१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता पोलीस मदत केंद्रासमोर शेकडो तरुणांनी दूध प्राशन करून नववर्षाचे स्वागत केले.

message of de-addiction

‘शराब नही, दूध पियेंगे’ उपक्रमाला २५ वर्षांची गौरवशाली परंपरा

फकीरा पठाण

मलकापूर पांग्रा : नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात न करता सामाजिक भान जपत, व्यसनमुक्त व सशक्त समाज उभारणीचा संकल्प घेऊन मलकापूर पांग्रा येथे गेल्या तब्बल २५ वर्षांपासून ‘शराब नही, दूध पियेंगे’ हा अभिनव उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. या गौरवशाली परंपरेनुसार ३१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता पोलीस मदत केंद्रासमोर शेकडो तरुणांनी दूध प्राशन करून नववर्षाचे स्वागत केले.

या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून गटविकास अधिकारी अजित बांगर, ठाणेदार गजानन करेवाड, नायब तहसीलदार डॉ. प्रवीण कुमार वराडे, गटशिक्षणाधिकारी निकम यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तरुणांनी दूध पिऊन व्यसनमुक्तीचा संकल्प केला.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते गुलशेर खासाब, शेख अकील ठेकेदार, सरपंचपती यादव टाले, संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष मोहम्मद यारखा, डॉ. दिनकर सोनुने, प्रवीण देशमुख, लोकजागरचे प्रवीण गीते, वसंतराव उदावंत, डॉ. सुरेश डोडिया, तंटामुक्ती अध्यक्ष आरिफ मलिक, शंकर उगलमुगले, अविनाश नागरे, बीट जमादार निवृत्ती पोफळे आदी उपस्थित होते.

नवीन वर्ष साजरे करताना दारू, व्यसन, अपघात व आरोग्याच्या समस्या वाढू नयेत, यासाठी २५ वर्षांपूर्वी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. त्या काळात दारू पिऊन नववर्ष साजरे करण्याची प्रथा मोठ्या प्रमाणात होती. त्याला छेद देत, “मरीज नाही, सशक्त बनूया” हा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी तरुणांनी दूध वाटपाचा आदर्श पायंडा पाडला.

कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार भगवान साळवे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष हानिप बागवान, पत्रकार वसीम शेख, ग्रामपंचायत सदस्य राजू साळवे, अमोल साळवे, माजी ग्रामपंचायत सदस्य अर्जुन मगर व ज्ञानेश्वर कळकुंबे यांनी केले.

 व्यसनमुक्तीसाठी एक लाख रुपयांचा पुरस्कार
व्यसनमुक्त समाज निर्माणासाठी येणाऱ्या काळात एक लाख रुपयांचा पुरस्कार देणार असल्याची घोषणा नुकतीच उमराहून परतलेल्या सत्तार बाबा यांनी केली.

 गाव व्यसनमुक्त करा, ग्रामपंचायतीत वाचनालय सुरू करणार
युवकांना मार्गदर्शन करताना गटविकास अधिकारी अजित बांगर यांनी महापुरुष व संतांचे विचार अंगीकारण्याचा सल्ला दिला. ग्रामपंचायतीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सार्वजनिक वाचनालय सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली.

नायब तहसीलदार डॉ. प्रवीण कुमार वराडे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून प्रत्येक गावात असे उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. ठाणेदार गजानन करेवाड यांनी दारू पिऊन वाहन चालवल्यामुळे होणाऱ्या अपघातांकडे लक्ष वेधत, “दारू न पिता दूध प्या आणि सशक्त बना,” असे आवाहन केले. गटशिक्षणाधिकारी निकम यांनी युवकांना वाचनाची नशा करण्याचा सल्ला दिला.प्रास्ताविक गजानन आटोळे यांनी केले, सूत्रसंचालन पत्रकार भगवान साळवे यांनी तर आभार प्रदर्शन तंटामुक्ती अध्यक्ष आरिफ मलिक यांनी केले. पोलीस, महसूल, शिक्षण व सामान्य प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे या उपक्रमाला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top