Mahabreaking

[breaking_news]

Beneficiaries deprived :सिंचन विहिरी, गुरांचे गोठे व इतर लाभांपासून लाभार्थी वंचित; बेमुदत उपोषणाचा इशारा 

Beneficiaries deprived : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील अनेक पात्र लाभार्थी सिंचन विहिरी, गुरांचे गोठे तसेच इतर शासकीय योजनांच्या लाभांपासून वंचित असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. प्रशासकीय मान्यता मिळूनही अद्याप कार्यारंभ आदेश न मिळाल्याने संतप्त लाभार्थ्यांनी ३१ डिसेंबर रोजी बाळापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात धडक दिली.

Beneficiaries deprived

बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील प्रकार : गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार

राहुल सोनोने

वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील अनेक पात्र लाभार्थी सिंचन विहिरी, गुरांचे गोठे तसेच इतर शासकीय योजनांच्या लाभांपासून वंचित असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. प्रशासकीय मान्यता मिळूनही अद्याप कार्यारंभ आदेश न मिळाल्याने संतप्त लाभार्थ्यांनी ३१ डिसेंबर रोजी बाळापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात धडक दिली.
अनंता काळे यांच्या नेतृत्वाखाली लाभार्थ्यांनी प्रशासनाकडे लेखी तक्रार सादर करत, वेळोवेळी संपर्क करूनही प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याचा आरोप केला आहे. प्रशासकीय मान्यता असूनही कामे मार्गी न लागल्याने लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
तक्रारीत नमूद केल्यानुसार, सिंचन विहिरी व गुरांच्या गोठ्यांचे प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावून ६ जानेवारी २०२६ पर्यंत प्रत्यक्ष लाभ द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा ७ जानेवारी २०२६, बुधवारपासून ग्रामपंचायत कार्यालय, वाडेगाव समोर पात्र लाभार्थी व वंचित नागरिकांसह आमरण उपोषण छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या सर्व कायदेशीर बाबींची जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे.
यावेळी अनंता काळे यांच्या नेतृत्वाखाली दत्ता मानकर, पंकज नावकार, नितेश लोखंडे, मुकीदा काळे, अनंता काथखेडे, सुरेश माने, गजानन मसने, पांडुरंग काथखडे, मुरलीधर धानोकार, प्रेम तायडे, अथर्व चिंचोळकर, सतीश जाधव आदी लाभार्थी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top