Mahabreaking

[breaking_news]

The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव

The historic Karvand Festival : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील करवंड ,बावन बुर्जी येथे १५ एप्रिल रोजी ऐतिहासिक करवंड महोत्सव साजरा होत असून मराठी संस्कृती आणि शिवकालीन इतिहासाचा हा अभूतपूर्व सोहळा असणार आहे. सांस्कृतिक कार्य विभाग आयोजित जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा व करवंड महोत्सव समिती यांच्या विशेष सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी गुणवंताबाई यांच्या ३७० व्या विवाह सोहळ्याच्या स्मृती दिनानिमित्त या ऐतिहासिक करवंड महोत्सवाची सुरुवात होत आहे .

The historic Karvand Festival

अशोक इंगळे

सिंदखेडराजा : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील करवंड ,बावन बुर्जी येथे १५ एप्रिल रोजी ऐतिहासिक करवंड महोत्सव साजरा होत असून मराठी संस्कृती आणि शिवकालीन इतिहासाचा हा अभूतपूर्व सोहळा असणार आहे. सांस्कृतिक कार्य विभाग आयोजित जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा व करवंड महोत्सव समिती यांच्या विशेष सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी गुणवंताबाई यांच्या ३७० व्या विवाह सोहळ्याच्या स्मृती दिनानिमित्त या ऐतिहासिक करवंड महोत्सवाची सुरुवात होत आहे .

कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री प्रताप जाधव ,  उद्घाटक ना.शिवेंद्रराजे भोसले , ना.आशिष शेलार सांस्कृतिक कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते होणार असून या सोहळ्याला केंद्रीय मंत्री श्रीमती रक्षाताई खडसे , पालकमंत्री मकरंद आबा पाटील , सह पालकमंत्री संजय सावकारे , कामगार मंत्री आकाश फुंडकर , आमदार किरण सरनाईक ,आमदार वसंत खंडेलवाल , आमदार धीरज लिंगाडे,आमदार चैनसुख संचेती,आमदार डॉ. संजय कुटे ,आमदार संजय गायकवाड , आमदार सिद्धार्थ खरात , आमदार मनोज कायंदे यांची विशेष उपस्थिती असणार आहे .  चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील स्वागताध्यक्ष असून सांस्कृतिक कार्य संचालनाय संचालक बिभीषण चवरे , व जिल्हाधिकारी डॉ.प्रवीण कुमार देवरे विनीत आहेत . करवंड  महोत्सवाचा मुख्य कार्यक्रम १५ एप्रिल २०२६ बुधवारला सकाळी सुरू होणार असून सात ते आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिषेक , सकाळी आठ ते दहा भव्य ऐतिहासिक शोभायात्रा , छत्रपती शिवराय आणि महाराणी गुणवंताबाई यांच्या भूमिकेत कलाकारांची उपस्थिती, लेझीम पथक, बँड पथक,अश्वदल , पालखी, आणि ऐतिहासिक वेशभूषेतील मावळे , शिवकालीन शस्त्रकला सादरीकरण, असे स्वरूपातून सकाळी १० ते १२ पावसाचे उद्घाटन होणार आहे, राज्यभरातील नामवंत पाहुण्यांच्या उपस्थितीत हा दिमागदार सोहळा सुरू होणार असून १२ ते २.३० पोवाडा व लोक कला सादरीकरण शिवशाहीर प्रवीण फणसे संच मुंबई यांचा कार्यक्रम, त्यानंतर ऐतिहासिक व्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रम व्याख्याते प्रा.यशवंत गोसावी, दुपारी तीन तीस ते चार तीस पोवाडे व लोककला सादरीकरण शाहीर विक्रांत राजपूत व संघ बुलढाणा,चार तीस ते पाच तीस इतिहासकार व शिवव्याख्याते पुणे यांचे युगपुरुष शिवराय या विषयावर व्याख्यान, सायंकाळी पाच तीस ते सहा डॉ.नम्रता भोसले संभाजीनगर यांचे मराठी कालीन स्त्री सामर्थ्य यावर व्याख्यान, सायंकाळी ७ ते १० महाराष्ट्राच्या महान संस्कृतीचा महा कलाविष्कार कलारंजन इव्हेंट अँड एंटरटेनमेंट ग्रुप मुंबई यांचा कार्यक्रम, यात मराठी पाऊल पडते पुढे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंग नाट्यरूपाने सादरीकरण तसेच राजेंच्या जीवनातील युद्धे, गोंधळ, जोगवा, कोळीगीत, पोवाडा दिंडी सोहळा इत्यादी ४५ कलावंताद्वारे भव्य अशा स्टेजवर सादरीकरण दिग्दर्शक निर्माते उदय साटम मुंबई, रात्री दहा वाजता ऐतिहासिक बारूद आतिषबाजी बावन बुर्जावरील होणारी नयनरम्य आतिषबाजी अशा प्रकारचा भव्य दिव्य कार्यक्रम होणार असून करवंड महोत्सवाचे आयोजन समिती यांनी महाराष्ट्रातून चिखली तालुक्यातील करवंड महोत्सवाला शिव प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे अशा प्रकारचे आव्हान स्वागताध्यक्ष आमदार श्वेताताई महाले, इंगळे घराण्याचे वंशज हरी रुद्र प्रताप रुद्र माने -इंगळे, करवंड महोत्सवाचे अध्यक्ष अरविंद बापू देशमुख व महोत्सव समिती यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top