Youth Foundation : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निपाणा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर युथ फाउंडेशन तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाणा येथील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

बोरगाव मंजू : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निपाणा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर युथ फाउंडेशन तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाणा येथील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
सामाजिक बांधिलकी जोपासणा हा उपक्रम खरोखरच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशी सुसंगत असल्याचे प्रतिपादन यावेळी गावचे सरपंच मनीष वर्गे यांनी केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अकोला पंचायत समिती अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाणा येथे भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच मनीष वर्गे तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.पूजा धम्मपाल खंडारे, सदस्या बबीता वानखडे, सपना मदन इंगळे ,आशा इंगळे ,माजी विद्यार्थी संघाचे मदनदादा इंगळे भारतीय सैन्य दलाचे आशीष माणिक इंगळे तसेच युथ फाउंडेशन चे अध्यक्ष प्रणय इंगळे ,स्वप्निल इंगळे ,रोशन इंगळे ,सम्यक इंगळे ,साहिल खंडारे ,अमर खंडारे ,प्रशिक इंगळे ,करण इंगळे ,सचिन इंगळे ,अमायरा इंगळे, दिपाली ताले ,स्वरा इंगळे ,अंकित इंगळे,कीर्ती तायडे ,वंदना इंगळे ,अंगणवाडी कर्मचारी आशा सेविका दुर्गाबाई इंगळे आदिंची उपस्थिती होती. याप्रसंगी विदर्भ कलाध्यापक संघातर्फे आयोजित विविध स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक राजेश ओहे यांनी तर आभार शिक्षक संदिप महल्ले यांनी मानले.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

