Mahabreaking

[breaking_news]

gripping investigation :पारस फाटा खूनप्रकरणाचा थरारक तपास; अनोळखी मारेकऱ्यांचा शोध घेत पोलिसांनी आवळल्या मुसक्या

gripping investigation : पारस फाटा उड्डाणपुलाजवळ वाहनाला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर प्राणघातक हल्ल्यात होऊन तरुणाचा मृत्यू झालेल्या खळबळजनक खूनप्रकरणाचा अखेर छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. घटनेनंतर पूर्णपणे अनोळखी असलेल्या दोन आरोपींचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले होते. मात्र, सलग सहा ते सात दिवस कसून तपास, तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांच्या माध्यमातून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी वैभव पुरुषोत्तम शितळे (वय २२, रा. जिल्हा परिषद कॉलनी, खडकी, अकोला) आणि गौरव गजानन घुगे (वय २६, रा. बोर्डे यांच्या घराजवळ, म्हाडा कॉलनी, खडकी, अकोला) या दोघांना ताब्यात घेतले आहे.

gripping

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; सहा-सात दिवसांच्या आव्हानात्मक तपासानंतर वैभव शितळे, गौरव घुगे ताब्यात

बाळापूर : पारस फाटा उड्डाणपुलाजवळ वाहनाला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर प्राणघातक हल्ल्यात होऊन तरुणाचा मृत्यू झालेल्या खळबळजनक खूनप्रकरणाचा अखेर छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. घटनेनंतर पूर्णपणे अनोळखी असलेल्या दोन आरोपींचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले होते. मात्र, सलग सहा ते सात दिवस कसून तपास, तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांच्या माध्यमातून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी वैभव पुरुषोत्तम शितळे (वय २२, रा. जिल्हा परिषद कॉलनी, खडकी, अकोला) आणि गौरव गजानन घुगे (वय २६, रा. बोर्डे यांच्या घराजवळ, म्हाडा कॉलनी, खडकी, अकोला) या दोघांना ताब्यात घेतले आहे.

दिनांक २९ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ११.३० वाजता फिर्यादी आणि त्यांचे मित्र अमरावती येथून सामानाची खरेदी करून अर्टिगा कार क्रमांक एमएच १२ टीव्ही ०६५२ ने बाळापूरकडे परतत होते. दरम्यान, भुसावळकडे जात असताना रस्त्यावरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पारस फाटा उड्डाणपुलाजवळ मागून पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या कारला कट मारला.

त्यानंतर दुचाकीस्वारांनी कारसमोर दुचाकी आडवी लावत फिर्यादी व त्यांच्या मित्रांशी शिवीगाळ केली. वाद वाढल्यानंतर आरोपींनी जवळील चाकूने फिर्यादी आणि त्यांचे मित्र मोईन गवळी यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या मोईन गवळी यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणात कलम १०३ (१) भारतीय न्याय संहिता (जुने कलम ३०२ भादंवि) तसेच इतर संबंधित कलमांची वाढ करण्यात आली.

आरोपी अनोळखी असल्याने तपासासमोर मोठे आव्हान

या गुन्ह्यातील आरोपी आणि फिर्यादी यांची यापूर्वी कोणतीही ओळख नव्हती. त्यामुळे आरोपींची नावे, मोबाईल क्रमांक किंवा त्यांच्या दुचाकीचा क्रमांक याबाबत कोणतीही ठोस माहिती पोलिसांकडे उपलब्ध नव्हती. घटनास्थळाच्या आसपासही सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नसल्याने आरोपींचा माग काढणे अधिकच कठीण झाले होते.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांना हा गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याच्या विशेष सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक लेव्हरकर यांनी स्वतंत्र विशेष पथकाची नियुक्ती करून तपासाला गती दिली.

सहा-सात दिवस सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बाळापूरपासून अकोलाकडे येणाऱ्या तसेच खामगावकडे जाणाऱ्या मार्गावरील विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज गेल्या सहा-सात दिवसांपासून बारकाईने तपासले. मात्र, संशयित आरोपी स्पष्टपणे कॅमेऱ्यात आढळून येत नसल्याने तपासाची दिशा निश्चित करणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत होते.

सीसीटीव्ही फुटेजमधून अपेक्षित माहिती मिळत नसतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आपल्या खबऱ्यांच्या जाळ्याला सक्रिय केले. त्यातून पोलिसांना या घटनेशी संबंधित महत्त्वाची आणि खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली. या माहितीने तपासाला निर्णायक दिशा मिळाली.

तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांच्या माहितीने आरोपींपर्यंत पोहोचले पोलिस

तांत्रिक विश्लेषणासोबतच खबऱ्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या माहितीची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर हा गुन्हा वैभव शितळे याने आपल्या साथीदारासह केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचून वैभव पुरुषोत्तम शितळे आणि गौरव गजानन घुगे या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता, वाहनाला कट लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून हा गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी बाळापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी निलेश देशमुख, गोपाल जाधव, विष्णु बोडखे, माजीद पठाण, अनिल चव्हाण तसेच पोलीस अंमलदार शेख हसन, उमेश पराये, सुलतान पठाण, फिरोज खान, भास्कर धोत्रे, अमीत दुबे, अब्दुल माजिद, रविंद्र खंडारे, महेंद्र मलिये, किशोर सोनोने, खुशाल नेमाडे, मंगेश इंगळे, वसीमोद्दीन, एजाज अहमद, राहुल गायकवाड, स्वप्नील खेडकर, श्रीकांत पातोंड, अन्सार अहमद, राज चंदेल, आकाश मानकर, धिरज वानखडे, पवन डांबलकर, अभिषेक पाठक, मोहम्मद आमीर, सतिश पवार, अशोक सोनवणे, भिमराव दिपके यांनी सहभाग घेतला. तसेच चालक विनोद ठाकरे, प्रविण कश्यप, रामकिसन डोईफोडे, मनिष ठाकरे, देवानंद खरात आणि प्रकाश लोखंडे यांनीही कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.

अनोळखी आरोपी, घटनास्थळी सीसीटीव्हीचा अभाव आणि उपलब्ध माहिती अत्यल्प असतानाही तांत्रिक तपासासोबत खबऱ्यांच्या जाळ्याचा प्रभावी वापर करून स्थानिक गुन्हे शाखेने या खूनप्रकरणाचा छडा लावल्याने पोलिसांच्या तपास पथकाच्या कामगिरीकडे लक्ष वेधले गेले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top