Mahabreaking

[breaking_news]

 illegal motor : शिंदी सिंचन तलावातील अवैध मोटारपंप ग्रामपंचायतीने काढले बाहेर

illegal motor :  शिंदी येथील सिंचन तलावातून अनधिकृतपणे पाणीउपसा करण्यासाठी लावण्यात आलेले मोटारपंप ग्रामपंचायतीच्या पथकाने मंगळवारी, २२ सप्टेंबर रोजी सकाळी कारवाई करून पाण्याबाहेर काढले. या कारवाईदरम्यान संबंधित शेतकऱ्यांनीही मोटारपंप काढण्यास स्वतःहून सहकार्य केले.

 illegal motor

  पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीची कारवाई; तलावातील अनधिकृत पाणीउपशाला लगाम

साखरखेर्डा   : शिंदी येथील सिंचन तलावातून अनधिकृतपणे पाणीउपसा करण्यासाठी लावण्यात आलेले मोटारपंप ग्रामपंचायतीच्या पथकाने मंगळवारी, २२ सप्टेंबर रोजी सकाळी कारवाई करून पाण्याबाहेर काढले. या कारवाईदरम्यान संबंधित शेतकऱ्यांनीही मोटारपंप काढण्यास स्वतःहून सहकार्य केले.

ग्रामपंचायत अधिकारी अनंता इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली लाईनमन बालाजी कदम यांच्या पथकाने सकाळी सुमारे ९ वाजता सिंचन तलाव परिसराची पाहणी केली. यावेळी श्रीराम बेलोडे, तुकाराम शिराळे, अनंता दहातोंडे, गणेश मार्के आणि लक्ष्मण दहातोंडे यांच्या तलावातील सुरू स्थितीतील मोटारपंप, स्टार्टर तसेच वायर पाण्याबाहेर काढण्यात आल्या.

यावर्षी अल निनोच्या प्रभावामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन सिंचन तलावातील पाण्याचा अनधिकृत उपसा रोखणे आणि उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. त्याच उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले.

कारवाईदरम्यान संबंधित शेतकऱ्यांना यापुढे पुन्हा अवैधरीत्या मोटारपंप, स्टार्टर अथवा वायर तलावात टाकून पाणीउपसा करू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. तसेच ग्रामपंचायतीच्या कारवाईनंतर पुन्हा मोटारपंप तलावात टाकून पाणीउपसा केल्यास त्यातून निर्माण होणाऱ्या परिणामास संबंधित शेतकरी स्वतः जबाबदार राहतील, असा इशाराही देण्यात आला आहे. ही कारवाई सिंचन उपविभाग, देऊळगाव राजा यांच्या सूचनेनुसार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, यावर्षी सिंचन तलावातील पाण्याचा वापर पूर्णतः राखीव ठेवण्यात येणार असून, आगामी काळातही अनधिकृत पाणीउपशावर ग्रामपंचायतीकडून लक्ष ठेवण्यात येणार आहे. पाण्याचे उपलब्ध साठे जपण्यासाठी ग्रामपंचायतीकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

या कारवाईवेळी ग्रामपंचायत अधिकारी अनंता इंगळे, बालाजी कदम, महावितरणचे श्री स्वप्नील इंगोले, ग्रामपंचायत कर्मचारी विशाल खंडागळे, सिद्धेश्वर वायाळ, गजानन भांड, पुरुषोत्तम खरात, अशोक खरात, गणेश चांदोर, अजय खंडागळे आणि अरुण खंडारे उपस्थित होते.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top