Mahabreaking

🔴 BREAKING
Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक   Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक  

Pratikshtai Tejenkar :डोणगाव पत्रकार संघाकडून रिसोडच्या तहसीलदार प्रतिक्षाताई तेजनकर यांचा सत्कार

Pratikshtai Tejenkar :रिसोड येथील तहसीलदार प्रतिक्षाताई तेजनकर यांना स्व. चतुराबाई स. पळसकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रदान करण्यात आलेल्या राजमाता माँ जिजाऊ पुरस्कार मिळाल्याबद्दल डोणगाव पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. हा सत्कार समारंभ दि. १ फेब्रुवारी रोजी डोणगाव येथे संपन्न झाला.

Pratikshtai Tejenkar

डोणगाव : रिसोड येथील तहसीलदार प्रतिक्षाताई तेजनकर यांना स्व. चतुराबाई स. पळसकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रदान करण्यात आलेल्या राजमाता माँ जिजाऊ पुरस्कार मिळाल्याबद्दल डोणगाव पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. हा सत्कार समारंभ दि. १ फेब्रुवारी रोजी डोणगाव येथे संपन्न झाला.

या प्रसंगी रिसोडचे ठाणेदार संतोष अघाव हेही डोणगाव येथे उपस्थित होते. त्यांचाही यावेळी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रशासकीय क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन हा सत्कार करण्यात आल्याने कार्यक्रमास विशेष महत्त्व प्राप्त झाले.

सत्कार समारंभास डोणगाव पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन गाभणे, उपाध्यक्ष अँड. जैनुल आबेद्दीन शेख, सचिव सुबोध आखाडे, मार्गदर्शक अशोकराव वानखेडे, तसेच सदस्य जमील पठाण, आवेज पठाण, अनिल राठोड, गणेश लहाने, राजेश वाघमारे, सुरेश फिसके, देविदास खनपटे उपस्थित होते. याशिवाय माजी कृषी सभापती राजेंद्र पळसकर, सकाळचे राम लहाने व अन्य पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी प्रतिक्षाताई तेजनकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. हा सत्कार डोणगाव पत्रकार संघ व प्रशासन यांच्यातील सकारात्मक समन्वयाचे प्रतीक ठरल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top