Mahabreaking

🔴 BREAKING
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर

Jagadguru Ramanandacharya Narendracharya ji :देऊळगाव राजात मंगळवारी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींचा पादुका दर्शन सोहळा

Jagadguru Ramanandacharya Narendracharya ji : जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमांतर्गत अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी (रामानंदाचार्य दक्षिणपीठ, नाणिजधाम) यांचा पादुका दर्शन सोहळा मंगळवार, दि. २७ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा पदमजी पिस्तमजी जिनिंग मैदान, धोंडीराज महाराज मठाजवळ, सकाळी १० वाजता, देऊळगाव राजा येथे संपन्न होणार आहे.

Jagadguru Ramanandacharya Narendracharya ji

देऊळगाव राजा : जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमांतर्गत अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी (रामानंदाचार्य दक्षिणपीठ, नाणिजधाम) यांचा पादुका दर्शन सोहळा मंगळवार, दि. २७ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा पदमजी पिस्तमजी जिनिंग मैदान, धोंडीराज महाराज मठाजवळ, सकाळी १० वाजता, देऊळगाव राजा येथे संपन्न होणार आहे.

या सोहळ्याप्रसंगी गुरुपूजन, उपासक दीक्षा, आरती सोहळा, जगद्गुरुश्रींचे प्रवचन, ज.न.म. प्रवचनकारांचे अमृततुल्य प्रवचन, दर्शन सोहळा तसेच पुष्पवृष्टी असे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम पार पडणार आहेत. अशी माहिती पश्चिम विदर्भ उपपीठ प्रमुख श्री. कुंडलिकराव वायभासे, पीठ सहप्रमुख श्री. संजय खंडागळे, पीठ व्यवस्थापक श्री. सुरेश मोरे व सहपीठ व्यवस्थापक श्री. ऋषिकेश बिरारी यांनी दिली.

जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी संस्थानाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये ग्राम स्वच्छता अभियान, शैक्षणिक उपक्रमांतर्गत इंग्रजी माध्यमाची मोफत शाळा, भव्य रक्तदान शिबिर, वैद्यकीय उपक्रमांतर्गत मोफत दवाखाना, मरणोत्तर देहदान व अवयवदान, मोफत रुग्णवाहिका सेवा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे पुनर्वसन, महिला सक्षमीकरणांतर्गत मोफत शिलाई यंत्र वाटप, मोफत घरघंटी वाटप, आपत्कालीन मदत व कायदेविषयक सल्लागार शिबिरे आदी उपक्रमांचा समावेश आहे.

या कार्यक्रमानिमित्त देऊळगाव राजा शहरातून जगद्गुरुश्रींच्या सिद्ध पादुकांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून, त्यामध्ये विविध देखाव्यांचे सादरीकरण होणार आहे. संतपीठावर पादुकांचे आगमन झाल्यानंतर पुढील धार्मिक कार्यक्रम संपन्न होतील. तसेच उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सामाजिक उपक्रमांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना मोफत १२ शिलाई यंत्रांचे वाटप करण्यात येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top