Mahabreaking

🔴 BREAKING
Bhim Jayanti :साखरखेर्डा नगरीत भीमजयंतीचा उत्साह;  लेझीम , टिपरी नृत्याने वेधले लक्ष Two Houses Burglarized :गंगानगरमध्ये चोरट्यांचा हैदोस, दोन घरे फोडली; सोने,चांदीची दागिणे केले लंपास The Bell Rings Again :17 वर्षांनी पुन्हा घंटा वाजली; दीनदयाल महाविद्याल;यात माजी विद्यार्थ्यांचा भावनिक ‘गेट टुगेदर’ Neminath Maharaj Saptah :ब्राह्मण चिकना येथे नेमिनाथ महाराज सप्ताहाची महाप्रसादाने सांगता Complaints of solar agricultural pump :सौर कृषी पंपधारकांच्या तक्रारींचा होणार जागेवरच निपटारा Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Bhim Jayanti :साखरखेर्डा नगरीत भीमजयंतीचा उत्साह;  लेझीम , टिपरी नृत्याने वेधले लक्ष Two Houses Burglarized :गंगानगरमध्ये चोरट्यांचा हैदोस, दोन घरे फोडली; सोने,चांदीची दागिणे केले लंपास The Bell Rings Again :17 वर्षांनी पुन्हा घंटा वाजली; दीनदयाल महाविद्याल;यात माजी विद्यार्थ्यांचा भावनिक ‘गेट टुगेदर’ Neminath Maharaj Saptah :ब्राह्मण चिकना येथे नेमिनाथ महाराज सप्ताहाची महाप्रसादाने सांगता Complaints of solar agricultural pump :सौर कृषी पंपधारकांच्या तक्रारींचा होणार जागेवरच निपटारा Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

 four thieves robbed :देऊळगाव राजात चार चोरट्यांनी युवकाला लूटले, मोबाईल व रोकड हिसकावली

four thieves robbed : येथील सातेफळ चौफुली परिसरात रविवारी पहाटे चार अनोळखी इसमांनी एका युवकाची मोटारसायकल अडवून मोबाईल व रोकड हिसकावून पळ काढला. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

 four thieves robbed

गजानन तिडके 

देऊळगाव राजा : येथील सातेफळ चौफुली परिसरात रविवारी पहाटे चार अनोळखी इसमांनी एका युवकाची मोटारसायकल अडवून मोबाईल व रोकड हिसकावून पळ काढला. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सूर्यकांत दिनकर सरोदे (वय २५ वर्षे, व्यवसाय – शिपाई, रा. पापळ, ता. जाफ्राबाद, जि. जालना) हे त्यांच्या मित्रासोबत जात असताना, दि. २५ जानेवारी २०२६ रोजी पहाटे सुमारे १ वाजताच्या सुमारास, देऊळगाव राजा येथील ताईची हॉटेल, सातेफळ चौफुलीजवळ दोन मोटारसायकलवरून आलेल्या चार अनोळखी इसमांनी त्यांची मोटारसायकल अडवली.

या चारही इसमांनी फिर्यादीच्या शर्टच्या खिशातील Oppo कंपनीचा जुना वापरातील स्मार्टफोन (अंदाजे किंमत १२ हजार रुपये) तसेच पँटच्या खिशातील पाकीट हिसकावून घेतले. त्या पाकिटात १,५०० रुपये रोख रक्कम, आधारकार्ड व वाहनचालक परवाना असल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. लूट केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात  भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा हेड कॉन्स्टेबल संजय गोरे यांनी दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजकुमार कांबळे हे करीत आहेत. पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक ब्रह्मागिरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत. नागरिकांनी रात्रीच्या वेळी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top