Mahabreaking

[breaking_news]

The birthday was celebrated :नि:शुल्क आरोग्य तपासणी व शौचालय दुरुस्ती करून साजरा केला वाढदिवस

The birthday was celebrated : वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी, सत्कार व अनावश्यक खर्चाला फाटा देत समाजोपयोगी उपक्रमांद्वारे माजी कृषी सभापती राजेंद्र पळसकर यांनी जनतेसमोर एक सकारात्मक व प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

The birthday

जन्मदिनी बॅनरबाजीला फाटा — माजी कृषी सभापती राजेंद्र पळसकर यांचा प्रेरणादायी उपक्रम

डोणगाव : वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी, सत्कार व अनावश्यक खर्चाला फाटा देत समाजोपयोगी उपक्रमांद्वारे माजी कृषी सभापती राजेंद्र पळसकर यांनी जनतेसमोर एक सकारात्मक व प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

डोणगाव येथे राजेंद्र पळसकर यांच्या पुढाकाराने दोन दिवसीय निशुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध आरोग्य तपासण्या, आवश्यक औषधोपचार, नेत्र तपासणी तसेच चष्मेवाटप करण्यात आले. ग्रामीण व गरजू नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घेतला.

याचबरोबर डोणगाव बसस्थानकाजवळील अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेले सार्वजनिक मुतारीघर स्वखर्चातून दुरुस्त करून पुन्हा नागरिकांच्या वापरासाठी खुले करण्यात आले. साचलेली घाण काढून साफसफाई करण्यात आली, संरचनात्मक दुरुस्ती केली गेली तसेच सुरक्षिततेसाठी लोखंडी पूल उभारण्यात आला. त्यामुळे ही सुविधा पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध झाली आहे.

स्वतःच्या वाढदिवशी स्वतःवर खर्च न करता जनतेच्या हितासाठी निधी खर्च करण्याचा संदेश देत राजेंद्र पळसकर यांनी सामाजिक बांधिलकीचे प्रभावी दर्शन घडवले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे नागरिकांमधून सर्वत्र कौतुक होत असून, हा उपक्रम इतरांसाठीही अनुकरणीय ठरत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top