Mahabreaking

[breaking_news]

Dr. Babasaheb Ambedkar :कारेगाव येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Dr. Babasaheb Ambedkar :लोणार तालुक्यातील कारेगाव महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी तथागत गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुजण  करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

Dr. Babasaheb Ambedkar

भागवत चव्हाण

कारेगाव: लोणार तालुक्यातील कारेगाव महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी तथागत गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुजण  करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी गायकवाड होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. साहेबराव हाडे विलास टोलमारे ,सरपंच विश्वास केंधळे, उपसरपंच मोतेकर  ,पांडुरंग केंधळे ,मोतीराम गायकवाड ,गजानन येवले ,सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि बौद्ध उपासक उपासीका गावकरी मंडळी उपस्थित होते.

डॉ. विकी वानखेडे,ॲड. हाडे , विठ्ठल गायकवाड, शिवाजी गायकवाड यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. मा. सरपंच कचरू इंगळे यांनी गीत गायन करूण अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक धम्मपाल वानखेडे यांनी केले. कार्यक्रमाला अजिंक्य पंडागळे, विशाल वानखेडे, कडुबा बोरकर,अनंत वानखेडे , गणेश पंडागळे ,गजानन वानखेडे ,अभय वानखेडे, राहूल वानखेडे ,मिलिंद वानखेडे ,राहूल पंडागळे ,निखिल वानखेडे, प्रफुल शेजुळ ,रवि खरात, किरण पंडागळे, पत्रकार भागवत चव्हाण याचे सहकार्य लाभले. शेवटी सायंकाळी गावामध्ये मिरवणूक काढण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top