Jai Bhim Chants in Patur :महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पातूर शहरात भव्य मिरवणूक काढून अभिवादन करण्यात आले. भिमजयंती सार्वजनिक उत्सव समिती पातूर शहराच्या वतीने १४ एप्रिल रोजी पातूर शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

व्यायाम शाळेच्या चित्तथरारक प्रत्यक्षिकांनी जिंकली उपस्थितांची मनं
पातूर : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पातूर शहरात भव्य मिरवणूक काढून अभिवादन करण्यात आले. भिमजयंती सार्वजनिक उत्सव समिती पातूर शहराच्या वतीने १४ एप्रिल रोजी पातूर शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली .

यामध्ये शहरातील रत्नदीप मित्र मंडळ महात्मा फुले नगर,भिमशक्ती व्यायाम शाळा भिमनगर, मिलिंद नवयुवक मंडळ मिलिंद नगर, समता नवयुवक मंडळ समता नगर, भिमज्योत व्यायाम शाळा पंचशील नगर,भिमक्रांती व्यायाम शाळा आंबेडकर नगर,भिमराजे ग्रुप गहिलोत लेआऊट असे विविध मंडळांनी उत्कृष्ट देखावे,डीजे,बँड पथक,व्यायाम शाळा आदींसह उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.या मिरवणुकीत भिमशक्ती व्यायाम शाळेच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली असून वाघाचे रूप घेऊन वाघ खेळण्याचा पारंपरिक खेळ या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण होता.मिरवणुकीची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान भिमनगर येथून झाली असून महात्मा फुले स्मारक संभाजी चौक,मिलिंद नगर,भगत वेटाळ,कान्होबा चौक मार्गे महात्मा फुले नगर बाळापूर वेस येथे समारोप करण्यात आला. समारोपीय कार्यक्रमाला पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हनुमंत डोपेवाड, पो.उप.निरीक्षक बंडू मेश्राम,पो.उप.निरीक्षक गोसावी,संजय निखाडे मेजर,परशराम उंबरकार हे प्रमुख उपस्थितीत होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्रिशरण-पंचशिल घेण्यात आले,त्यानंतर चिमुकल्यांनी आपल्या भाषणातून बाबासाहेबांच्या विचारांवर प्रकाश टाकला.तसेच रत्नदीप मित्र मंडळाच्या सौजन्याने पारितोषिकांचे वितरण करण्यात आले असून प्रथम पारितोषिक भिमशक्ती व्यायाम शाळा, द्वितीय पारितोषिक समता नवयुवक मंडळ,तृतीय पारितोषिक भिमक्रांती व्यायाम शाळा यांनी पटकावले.
ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत
शहरात ठिकठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त स्वागत करण्यात आले. बाळापुर महामार्गावरील छत्रपती संभाजी महाराज चौकात माजी नगरपरिषद उपाध्यक्ष सुरेश फुलारी, माजी नगरसेवक शंकरराव बोचरे, पत्रकार संजय गोतरकर, निर्भय पोहरे, परशराम बंड, गजानन बारताशे, माजी न.प.उपाध्यक्ष परसराम उंबरकर ,सुरेंद्र उगले, सुनील सुरवाडे, विशाल गोतरकर, गोविंद राहुळकर, प्राध्यापक भोंगळे, यांच्यासह विविध राजकीय सामाजिक प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच फटाक्यांची आतिषबाजी केली. तसेच हिंदू खाटीक समाजबांधव व महासंघाच्या वतीने नागरिकांसाठी थंड पाणी व सरबत शीतपेयाचे वितरण करण्यात आले. त्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. एका हरहूननरी कार्यकर्त्यांने चक्क बैलगाडी सजवून त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावून फुगे लावून सुंदर बैलगाडी सजवली. व नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. तसेच विविध देखाव्यांनी नागरिकांच्या डोळ्यांचे पारणे भेडले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय, या घोषणांनी संपूर्ण महामार्ग दणाणून गेला होता.
मोठ्या संख्येने शोभायात्रेमध्ये बौद्ध उपासक व उपासीका यांनी , सहभाग नोंदवला. तरुणांनी तसेच महिलांनी लाठीकाटी फिरवून प्रेक्षकांचे लक्ष वेधले. संभाजी चौकात मोठी गर्दी झाल्याने पोलीस प्रशासनाची दमछाक झाली होती. एवढ्या मोठ्या मिरवणुकीतून मार्ग काढताना वाहनांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. बोटावर मोजणी इतके एक ट्राफिक पोलीस व होमगार्ड, व नागरिकांनी दुचाकी वाहनांना रस्ता मोकळा केला. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविणे गरजेचे होते. तसेच पोलीस प्रशासनाच्या नियोजनाचा मोठ्या प्रमाणात अभाव दिसून आला. शोभा यात्रेमध्ये वाघांची भूमिका साकारणारे प्रकाश पोहरे व प्रल्हाद वानखडे यांनी नागरिकांचे लक्ष वेधले.
सदर कार्यक्रम भिमजयंती सार्वजनिक उत्सव समितीचे स्वप्निल सुरवाडे यांच्या नियोजनात पार पडला असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनिल सुरवाडे,भगवान डोंगरे,भास्कर सुरवाडे,विनोद सिरसाट,माणिक सुरवाडे,अमोल बागडे,प्रमोद खंडारे, निर्भय पोहरे,कपिल पोहरे,जितेश सिरसाट,धिरज खंडारे,प्रविण पोहरे,भिमराव पोहरे,सचिन सुरवाडे,मंगेश डोंगरे,सतिश सुरवाडे,सचिन पोहरे,सागर इंगळे,मंगेश गवई,जितेंद्र तेलगोटे,प्रमोद सुरवाडे,सिद्धार्थ सुरवाडे,आकाश घुगे,ऋतिक निखाडे,आकाश बारताशे, गौरव डोंगरे,अक्षय मालसुरे,प्रेम सुरवाडे,अमोल सुरवाडे,आशिष सुरवाडे आदींनी परिश्रम घेतले.

