Mahabreaking

🔴 BREAKING
Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट

Udaan 2026 : श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन ‘उडान २०२६’ उत्साहात संपन्न

Udaan 2026 : भारतीय सेवा सदन द्वारा संचालित श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय, अकोला येथे स्नेहसंमेलन ‘उडान २०२६’ मोठ्या उत्साहात पार पडले. भारतीय सेवा सदनचे अध्यक्ष दिलीपराज गोयनका, उपाध्यक्ष रवींद्रकुमार गोयनका, भरतराज गोयनका, सचिव आलोककुमार गोयनका तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. चारूशिला रुमाले यांच्या मार्गदर्शनाखाली या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

Udaan 2026

‘सप्तरंग – द रेनबो कलर्स ऑफ लाईफ’ या संकल्पनेवर आधारित बहारदार स्नेहसंमेलन

अकोला : भारतीय सेवा सदन द्वारा संचालित श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय, अकोला येथे स्नेहसंमेलन ‘उडान २०२६’ मोठ्या उत्साहात पार पडले. भारतीय सेवा सदनचे अध्यक्ष दिलीपराज गोयनका, उपाध्यक्ष रवींद्रकुमार गोयनका, भरतराज गोयनका, सचिव आलोककुमार गोयनका तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. चारूशिला रुमाले यांच्या मार्गदर्शनाखाली या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

शनिवार, दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी स्नेहसंमेलनाचे उद्घाटन भारतीय सेवा सदनचे अध्यक्ष दिलीपराज गोयनका यांच्या हस्ते झाले. यावेळी एन.सी.सी. युनिटद्वारे मानवंदना देण्यात आली. उद्घाटक व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते माता सरस्वती तसेच श्रद्धेय माताजी श्रीमती राधादेवी गोयनका व श्री किसनलाल गोयनका यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

याप्रसंगी प्रफुल्ल संघवी, सुनील अग्रवाल, इंदूबाला चौधरी, प्राचार्य डॉ. चारूशिला रुमाले, उपप्राचार्य प्रा. परिमल मुजुमदार, सुधाकरराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास पांडे, आरडीजी पब्लिक स्कूलचे प्राचार्य कुरियचन सी. पी., उपप्राचार्य श्वेता चोमवाल तसेच स्नेहसंमेलन समन्वयक डॉ. ललित भट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी दिलीपराज गोयनका यांनी स्त्री सशक्तीकरण ही काळाची गरज असल्याचे नमूद करत, माताजींच्या मुलींना सक्षम व स्वावलंबी घडविण्याच्या उदात्त ध्येयाचा उल्लेख केला. महाविद्यालयातील रोजगाराभिमुख, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांची माहिती देत विद्यार्थिनींना आर्थिक स्वावलंबनाचा संदेश त्यांनी दिला.

प्राचार्य डॉ. चारूशिला रुमाले यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रम, विद्यापीठ गुणवत्ता यादी, पुरस्कार, एन.सी.सी., एन.एस.एस. तसेच संशोधन केंद्राचा सविस्तर अहवाल सादर केला.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेल्या विद्यार्थिनींसह आचार्य पदवी प्राप्त प्राध्यापक, एन.सी.सी., क्रीडा व विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Udaan 2026

२०२५-२६ चा ‘स्टुडंट ऑफ द इयर’ पुरस्कार कु. श्रावणी काळे हिला प्रदान करण्यात आला. यावेळी रोख ₹५,०००, फिरता चषक व प्रमाणपत्र देण्यात आले.

उद्घाटन समारंभात गणेश वंदना, देशभक्तीपर नृत्य तसेच ‘सप्तरंग’ या संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक नृत्य सादर करण्यात आले. शिवराज्याभिषेक, ऑपरेशन सिंदूर, विठ्ठल-विठ्ठल आणि देशभक्ती गीतांवर आधारित नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी आरडीजी सिंगिंग स्टार, आरडीजी डान्सिंग स्टार आणि आरडीजी आयडॉल या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन डॉ. निभा उपाध्याय व डॉ. शालिनी बंग यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. ललित भट्टी यांनी केले.

स्नेहसंमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. चारूशिला रुमाले, उपप्राचार्य प्रा. परिमल मुजुमदार, स्नेहसंमेलन समन्वयक डॉ. ललित भट्टी, डॉ. श्वेता मेंढे, डॉ. निभा उपाध्याय तसेच विविध समित्यांतील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला प्राध्यापकवर्ग, कर्मचारी, विद्यार्थिनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top