Mahabreaking

🔴 BREAKING
Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट

sand smugglers :रेती तस्करांवर प्रशासनाचा ‘बुलडोझर’; चार बोटी उद्ध्वस्त, ५५ लाखांचा एवज नष्ट

sand smugglers : महसूल व पोलीस विभागाकडून सातत्याने कारवाई सुरू असतानाही अवैध रेती उत्खनन व वाहतूक करणाऱ्या रेती तस्करांचा मुजोरपणा थांबताना दिसत नाही. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी सक्त कारवाईचे निर्देश दिले होते. त्या आदेशानुसार महसूल व पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने २४ डिसेंबर रोजी पहाटे सहा वाजता खडकपूर्णा परिसरात धडक कारवाई करत अवैध रेती उत्खनन करणाऱ्या चार बोटी उद्ध्वस्त केल्या. या कारवाईत सुमारे ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला.

sand smugglers

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर महसूल-पोलीसांची धमाकेबाज संयुक्त कारवाई

गजानन तिडके 
देऊळगाव राजा : महसूल व पोलीस विभागाकडून सातत्याने कारवाई सुरू असतानाही अवैध रेती उत्खनन व वाहतूक करणाऱ्या रेती तस्करांचा मुजोरपणा थांबताना दिसत नाही. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी सक्त कारवाईचे निर्देश दिले होते. त्या आदेशानुसार महसूल व पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने २४ डिसेंबर रोजी पहाटे सहा वाजता खडकपूर्णा परिसरात धडक कारवाई करत अवैध रेती उत्खनन करणाऱ्या चार बोटी उद्ध्वस्त केल्या. या कारवाईत सुमारे ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला.
जिल्हाधिकारी किरण पाटील, उपविभागीय अधिकारी संजय खडसे व देऊळगाव राजा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे मेहुणा राजा येथील खडकपूर्णा धरणाच्या विश्रामगृहाजवळील जलाशयात ही कारवाई करण्यात आली. गस्ती पथकाला जलाशयात अवैधपणे रेती उत्खनन करणाऱ्या दोन मोठ्या फायबर बोटी व दोन इंजिन बोटी आढळून आल्या.

sand smugglers
सदर बोटींसह त्यावर काम करणाऱ्या तीन परप्रांतीय मजुरांना पोलीस विभागाने ताब्यात घेतले. त्यानंतर या सर्व बोटी सीनगाव जहागीर येथील जलाशय काठावर सुरक्षितरीत्या आणून महसूल व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत ब्लास्टिंगद्वारे नष्ट करण्यात आल्या.
या संयुक्त कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम, महसूल नायब तहसीलदार सायली जाधव, पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी, महिला पोलीस उपनिरीक्षक क्रांती ढाकणे, मंडळ अधिकारी विजय हिरवे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद मुळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल रामकिसन गीते, अशोक सांगळे, विजय दराडे, प्रवीण डोईफोडे, सुरेश डोईफोडे, परमेश्वर बुरकुल, सुषमा रगडे, संतोष चेके, गजानन ठाकरे, सोळंकी, महसूल सेवक कविता शिरसाठ तसेच खडकपूर्णा प्रकल्प उपविभागाचे सुरक्षा कर्मचारी पुरुषोत्तम भागीले उपस्थित होते.
खडकपूर्णा जलाशय व नदीपात्रात अवैध रेती उत्खनन, वाहतूक व साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध महसूल व पोलीस विभागाची संयुक्त कारवाई यापुढेही अधिक तीव्र केली जाईल, असा इशारा उपविभागीय अधिकारी संजय खडसे व उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांनी दिला आहे.या कारवाईमुळे रेती तस्करांमध्ये खळबळ उडाली असून, प्रशासनाच्या कठोर भूमिकेमुळे जिल्ह्यातील अवैध रेती व्यवसायाला मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top