Mahabreaking

[breaking_news]

Tehsildar conducts surprise :सिंनगाव जहागीर शिवारात तहसीलदारांची मध्यरात्री धडक; अवैध रेती वाहतुकीचे दोन टिप्पर पकडले

Tehsildar conducts surprise : तालुक्यात अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरोधात महसूल विभागाने कारवाईचा धडाका सुरू ठेवला असून, तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या कारवाईत अवैध रेती वाहतूक करणारे दोन टिप्पर पकडण्यात आले. ही कारवाई सोमवार, दि. १० ऑगस्ट रोजी मध्यरात्री सुमारे २.३० वाजता मौजे सिंनगाव जहागीर शिवारात करण्यात आली.

Tehsildar conducts surprise

  रात्री अडीच वाजता महसूल पथकाची कारवाई; रेती वाहतूक करणारे दोन टिप्पर ताब्यात

गजानन तिडके

देऊळगाव राजा : तालुक्यात अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरोधात महसूल विभागाने कारवाईचा धडाका सुरू ठेवला असून, तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या कारवाईत अवैध रेती वाहतूक करणारे दोन टिप्पर पकडण्यात आले. ही कारवाई सोमवार, दि. १० ऑगस्ट रोजी मध्यरात्री सुमारे २.३० वाजता मौजे सिंनगाव जहागीर शिवारात करण्यात आली.

tipper

महसूल विभागाच्या पथकाला सिंनगाव जहागीर शिवारातून अवैधरीत्या रेती वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या नेतृत्वाखाली पथकाने मध्यरात्री कारवाई केली. यावेळी रेतीची वाहतूक करणारे दोन टिप्पर आढळून आल्याने दोन्ही वाहने ताब्यात घेण्यात आली.

पकडण्यात आलेले दोन्ही टिप्पर पुढील दंडात्मक कार्यवाहीसाठी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अटकावून ठेवण्यात आले आहेत. या वाहनांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली. महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यात टिप्पर क्रमांक -MH. 21-BH. 9001 आणि दुसऱ्या टिप्पर वर नंबर सर्व ठिकाणी खोडलेला असल्याचे आढळले.

या कारवाईत ग्राम महसूल अधिकारी आकाश खरात, परमेश्वर बुरकुल, बबन काकड आणि विठ्ठल हरणे यांनी सहभाग घेतला. महसूल विभागाच्या या मध्यरात्रीच्या कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

दरम्यान, तालुक्यात अवैध रेती उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल विभागाकडून नियमितपणे तपासणी व कारवाई करण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी होणाऱ्या अवैध रेती वाहतुकीवरही प्रशासनाने लक्ष केंद्रित केले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top