Mahabreaking

🔴 BREAKING
Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला

Success in MLA Manoj Kayande : आमदार मनोज कायंदे यांच्या पाठपुराव्याला यश ;साखरखेर्डा येथे अप्पर तहसील कार्यालयाला तत्त्वतः मान्यता

Success in MLA Manoj Kayande : तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी साखरखेर्डा येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याच्या प्रस्तावाला शासनाने तत्त्वतः मान्यता दिली असून यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती मागविण्यात आली आहे. लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.सिंदखेड राजा मतदार संघाचे युवा आमदार मनोज कायंदे यांनी याविषयी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्याकडे याविषयी पाठपुरावा केला होता. कायंदे यांच्या पाठपुराव्याला आता यश मिळाले आहे. या निर्णयामुळे साखरखेर्डा परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Success in MLA Manoj Kayande

गजानन तिडके 

देऊळगाव राजा : तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी साखरखेर्डा येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याच्या प्रस्तावाला शासनाने तत्त्वतः मान्यता दिली असून यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती मागविण्यात आली आहे. लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.सिंदखेड राजा मतदार संघाचे युवा आमदार मनोज कायंदे यांनी याविषयी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्याकडे याविषयी पाठपुरावा केला होता. कायंदे यांच्या पाठपुराव्याला आता यश मिळाले आहे. या निर्णयामुळे साखरखेर्डा परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सिंदखेड राजा तालुक्यातील अनेक गावांतील नागरिकांना महसूल व इतर प्रशासकीय कामांसाठी तब्बल ५० किलोमीटरपेक्षा अधिक अंतर पार करून तहसील मुख्यालय गाठावे लागत होते. त्यामुळे वेळ व खर्चाचा मोठा अपव्यय होत असून नागरिकांमध्ये नाराजी वाढत होती. या पार्श्वभूमीवर साखरखेर्डा येथे स्वतंत्र तालुका निर्माण करण्याची मागणी स्थानिक पातळीवर होत होती. स्वतंत्र तालुक्याचा निर्णय अद्याप प्रलंबित असला तरी अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव पुढे सरकला असून त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या संदर्भात आमदार मनोज कायंदे यांनी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे साखरखेर्डा येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शासनाने प्रस्तावाबाबत आवश्यक प्रशासकीय माहिती मागवली असून पुढील निर्णय लवकरच अपेक्षित आहे. कार्यालय सुरू झाल्यानंतर परिसरातील गावांतील नागरिकांची महसूल दाखले, जमीन नोंदी आदी कामांसाठीची धावपळ कमी होणार आहे.

दरम्यान, महसूल व वन विभागांतर्गत राज्यात अपर जिल्हाधिकाऱ्यांची ११ पदे निर्माण करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. भौगोलिक क्षेत्र, वाढती लोकसंख्या आणि प्रशासकीय अंतर लक्षात घेऊन सेवा अधिक जलद व प्रभावी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सिंदखेड राजा तालुक्यासह मेहकर तालुक्यातील डोणगाव आणि खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथेही अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आले असून त्यावर निर्णय प्रलंबित आहे.

ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवा सुलभपणे उपलब्ध व्हाव्यात, प्रशासनावरील ताण कमी व्हावा आणि प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लागावीत, या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.या मंजुरीबाबत आमदार मनोज कायंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच पालकमंत्री मकरंद पाटील यांचे आभार मानले.

स्व. लोकनेते अजितदादा पवार यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे साखरखेर्डा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर करण्याची मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने साखरखेर्डा येथे अप्पर तहसील कार्यालयास मंजुरी मिळाली असून साखरखेर्डा व परिसरातील सर्व गावांना याचा मोठ्या प्रमाणावर लाभ होणार आहे. यामुळे प्रशासनावरील ताण कमी होऊन अनेक शासकीय कामे अधिक वेगाने मार्गी लागतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या मंजुरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच पालकमंत्री मकरंद पाटील यांचे मनःपूर्वक आभार.                               मनोज कायंदे, आमदार, मातृतीर्थ सिंदखेड राजा विधानसभा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top