Mahabreaking

[breaking_news]

Pramod Dandge :व्यसनमुक्तीचा संदेश देणाऱ्या प्रमोद दांडगे यांना राज्यस्तरीय सन्मान!

Pramod Dandge : समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील सातगाव मसला येथील शिवाधिकारी प्रमोद दादा दांडगे यांना महाराष्ट्र शासनाकडून व्यसनमुक्ती व समाजप्रबोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय सन्मानाने गौरविण्यात आले.

Pramod Dandge

राष्ट्रसंतांच्या विचारांची कास धरून समाजप्रबोधन; दांडगे यांचा गौरव

बुलढाणा : समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील सातगाव मसला येथील शिवाधिकारी प्रमोद दादा दांडगे यांना महाराष्ट्र शासनाकडून व्यसनमुक्ती व समाजप्रबोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय सन्मानाने गौरविण्यात आले.

मुंबई येथे पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले तसेच महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते दांडगे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. प्रमोद दांडगे हे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारधारेवर चालत समाजसेवेचे कार्य करीत आहेत. व्यसनमुक्ती अभियान, समाजप्रबोधन आणि ग्रामीण भागात जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या कार्यातून युवकांना नवी दिशा मिळत असून समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे.दांडगे यांना प्रसिद्ध शाहीर दुर्गादास दांडगे यांचा वारसा लाभला असून, त्यांनीही आपल्या कलेच्या माध्यमातून समाजजागृतीचा ध्यास घेतला आहे. परंपरेतून मिळालेल्या संस्कारांना आधुनिक सामाजिक कार्याची जोड देत त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.या सन्मानाबद्दल बुलढाणा जिल्हा गुरुदेव सेवा मंडळ तसेच तहसील मित्र मंडळाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. “हा पुरस्कार केवळ व्यक्तीचा नसून समाजातील प्रत्येक सकारात्मक कार्यकर्त्याचा सन्मान आहे,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.प्रमोद दांडगे यांचा हा गौरव ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, समाजसेवेच्या वाटचालीत नवे बळ देणारा ठरला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top