Speeding tractor :देऊळगावमही येथे रस्त्याने पायी जात असलेल्या व्यक्तीला भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालविलेल्या लाल रंगाच्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याची घटना १ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेख महेबुब शेख बिस्मील्ला यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी ट्रॅक्टरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालवला अन् पादचाऱ्याचा बळी; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
गजानन तिडके
देऊळगाव राजा : देऊळगावमही येथे रस्त्याने पायी जात असलेल्या व्यक्तीला भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालविलेल्या लाल रंगाच्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याची घटना १ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेख महेबुब शेख बिस्मील्ला यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी ट्रॅक्टरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देऊळगावमही येथील शेख आरीफ शेख यासीन (वय ५६) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा भाचा शेख महेबुब शेख बिस्मील्ला हा १ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीपूर्वी देऊळगावमही येथील रस्त्याने पायी जात होता.
यावेळी परवेज खाँ पठाण यांच्या खाली जागेसमोर रस्त्यावरून जात असताना लाल रंगाच्या एमएच-२८-बीक्यू-९५६१ क्रमांकाच्या ट्रॅक्टरच्या चालकाने आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून शेख महेबुब यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेनंतर या प्रकरणाची नोंद आकस्मिक मृत्यू क्रमांक २९३/२०२६ अन्वये करण्यात आली होती. त्यानंतर शेख आरीफ शेख यासीन यांच्या तोंडी रिपोर्टवरून देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात कायमस्वरूपी अपघात क्रमांक ४५३/२०२६ दाखल करण्यात आला.
पोलिसांनी ट्रॅक्टरचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१ आणि १०६(१) तसेच मोटार वाहन कायदा कलम १३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा ६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३.१९ वाजता दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोहेकॉ शरद साळवे (ब.नं. ३८२) यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ कलीम देशमुख (ब.नं. १४०२) करीत आहेत. अपघातास नेमके कारण, वाहनचालकाची भूमिका आणि घटनेशी संबंधित इतर बाबींचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

