Mahabreaking

[breaking_news]

unidentified vehicle : रोहणा फाट्यावर अज्ञात वाहनाची पादचाऱ्याला धडक; गंभीर जखमी वृद्धाचा मृत्यू

unidentified vehicle :  रोहणा गावातून रोहणा फाट्याकडे पायी जात असलेल्या एका व्यक्तीला भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना ११ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्रकरणी तब्बल काही महिन्यांनंतर देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

accident
भरधाव अज्ञात वाहनाची धडक; रोहणा रस्त्यावर पादचाऱ्याचा बळी, चालक फरार

गजानन तिडके 

देऊळगाव राजा : रोहणा गावातून रोहणा फाट्याकडे पायी जात असलेल्या एका व्यक्तीला भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना ११ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्रकरणी तब्बल काही महिन्यांनंतर देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टाकरखेड भागीले, ता. देऊळगाव राजा येथील अमोल गुलाबराव डोंगरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे वडील रोहणा गावातून रोहणा फाट्याकडे डांबरी रस्त्याने पायी येत होते. ११ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७ ते ७.३० वाजताच्या दरम्यान रोहणा फाटा ते रोहणा गावादरम्यानच्या रस्त्यावर अज्ञात वाहनचालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून त्यांच्या वडिलांना जोरदार धडक दिली.
या धडकेत ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून वाहनासह निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. गंभीर दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेप्रकरणी अमोल डोंगरे यांच्या जबाबावरून तसेच आकस्मिक मृत्यू क्रमांक २९२/२०२६च्या अनुषंगाने देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २८१, १२५(अ), १२५(ब) व १०६(१) अन्वये गुन्हा क्रमांक ४५२/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ७.३९ वाजता दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोहेकॉ समाधान गिते (ब.नं. १९७३) यांनी केली. पुढील तपास पोहेकॉ शरद साळवे (ब.नं. ३८२) करीत आहेत.
अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा तसेच चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. घटनास्थळ, वाहनाची माहिती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top