Mahabreaking

🔴 BREAKING
District Collector  :जिल्हाधिकारी उद्या बाळापुर दौर्‍यावर; जनसंवाद बैठकीत नागरिकांना समस्या मांडण्याचे आवाहन   Satypal Maharaj :महिलांच्या अंगातून अंधश्रद्धा निर्मुलन होत नाही तोपर्यंत समाज सुधारणा अशक्य : सत्यपाल महाराज Speeding Cargo Vehicle :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव मालवाहु उलटले; सुदैवाने जीवितहानी टळली District-Level Program :दिग्रस येथील जिल्हा परिषद शाळेत उद्या गुढीपाडवा ,पट वाढवा जिल्हास्तरीय कार्यक्रम Prataprao Jadhav :सत्यशोधक चळवळ सुरू करुन सामाजिक क्रांती घडविण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी केले : प्रतापराव जाधव 1 quintal and 12 kg of ganja :एक क्विंटल १२ किलो गांजासह ५५ लाख ७८ हजारांचा एवज जप्त, दोन आरोपींना अटक District Collector  :जिल्हाधिकारी उद्या बाळापुर दौर्‍यावर; जनसंवाद बैठकीत नागरिकांना समस्या मांडण्याचे आवाहन   Satypal Maharaj :महिलांच्या अंगातून अंधश्रद्धा निर्मुलन होत नाही तोपर्यंत समाज सुधारणा अशक्य : सत्यपाल महाराज Speeding Cargo Vehicle :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव मालवाहु उलटले; सुदैवाने जीवितहानी टळली District-Level Program :दिग्रस येथील जिल्हा परिषद शाळेत उद्या गुढीपाडवा ,पट वाढवा जिल्हास्तरीय कार्यक्रम Prataprao Jadhav :सत्यशोधक चळवळ सुरू करुन सामाजिक क्रांती घडविण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी केले : प्रतापराव जाधव 1 quintal and 12 kg of ganja :एक क्विंटल १२ किलो गांजासह ५५ लाख ७८ हजारांचा एवज जप्त, दोन आरोपींना अटक

Speeding Cargo Vehicle :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव मालवाहु उलटले; सुदैवाने जीवितहानी टळली

Speeding Cargo Vehicle : स्थानिक पोलिस चौकी अंतर्गत येत असलेल्या अकोला वाडेगाव मार्गावर मंगळवार रोजी सकाळी ११ वाजता दरम्यान कुटाराने भरलेल्या मालवाहतूक गाडी अचानक नियत्रंण सुटल्याने उलटली.या अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली.

Speeding Cargo Vehicle

राहुल सोनोने

वाडेगाव: स्थानिक पोलिस चौकी अंतर्गत येत असलेल्या अकोला वाडेगाव मार्गावर मंगळवार रोजी सकाळी ११ वाजता दरम्यान कुटाराने भरलेल्या मालवाहतूक गाडी अचानक नियत्रंण सुटल्याने उलटली.या अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली.

अकोला वाडेगाव मार्गावर असलेल्या झोपडपट्टी नजीक  वाडेगाव वरून अकोला कडे जात असताना विरुद्ध दिशेने  शेतातून येत असलेल्या बैल गाड़ीतील मजुराना वाचविण्या करीता चालकाने ब्रेक मारले. त्यामुळे, चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप गाडी क्र एम एच ३० ए बी ११५१ उलटली.या अपघाताने  काही वेळ वाहतुक ठप्प झाली होती.या अपघातामध्ये  सुदैवाने जिवीत हानी झाली नाही भरलेल्या पिकअप गाडीमध्ये खेट्री येथील ४ मजुर गाडीत होते. गाड़ी उलटल्याने  डिझल टॅक फुटून त्यामधील सर्व डिझल रस्त्यावर पसरले होते .तपत्या उन्हात पसरलेल्या डिझल मुळे सोयाबिन कुटाराने पेट घेतला नाही.  माहीती मिळताच वाडेगाव पोलिस चौकीचे बिट जमादार सुरेश ढोरे यांनी घटनास स्थळी जाऊन वाहतुक सुरळीत केली. तसेच जखमीना प्राथमिक आरोग्य केंद्र वाडेगाव उपचारा करीत पाठविण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. या मार्गावरून जोरात जात असलेल्या वाहनाची गती कमी करण्याकरीता इंदिरा नगर जवळ  गतिरोधक देण्यात यावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जाते. या परिसरात गतिरोधक न बसवल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थंनी दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top