Mahabreaking

[breaking_news]

Speeding Cargo Vehicl :भरधाव मालवाहु वाहनाची दुचाकीस धडक, दोन युवक गंभीर

Speeding Cargo Vehicl : भरधाव मालवाहु वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने दोन युवक गंभीर जखमी झाले. ही घटना 6 मे रोजी सायंकाळी मलकापूर पांग्रा ते साखरखेर्डा रस्त्यावर घडली.  दोन्ही युवकांच्या पायांना जोरदार मार लागला आहे.

Speeding Cargo Vehicl

मलकापूर पांग्रा ते साखरखेर्डा मार्गावरील घटना

फकीरा पठाण

मलकापूर पांग्रा : भरधाव मालवाहु वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने दोन युवक गंभीर जखमी झाले. ही घटना 6 मे रोजी सायंकाळी मलकापूर पांग्रा ते साखरखेर्डा रस्त्यावर घडली.  दोन्ही युवकांच्या पायांना जोरदार मार लागला आहे.

लव्हाळा येथून रोपे खाली करून परत येत असलेल्या एमएच 20 जीसी 7660 क्रमांकाच्या वाहनाने समोरून जात असलेल्या एमएच 28 बीपी 9795 क्रमांकाच्या मोटरसायकलला मागून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की, दुचाकीवरील दोघे युवक रस्त्यावर फेकले गेले.

या अपघातात अक्षय धर्मा काकडे (वय २२, रा. मलकापूर पांगरा) आणि राहुल अनिल राठोड (वय २६, रा. शिवनी) हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पायांना फ्रॅक्चर झाल्याचे समोर आले आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, अपघातातील वाहन चालक आदित्य पंचाळ (रा. संभाजीनगर) हा महारुद्र हायटेक नर्सरी, संभाजीनगर येथून रोपे घेऊन लव्हाळा येथे उतरवून पुन्हा संभाजीनगरकडे परत जात असताना ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून जखमींना प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र, मलकापूर पांगरा येथे दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना संभाजीनगर येथे हलविण्यात आले.बातमी लिहीपर्यंत या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top