Revenue Grievance Redressal Camp :गावातील नागरिकांना महसुली व इतर शासकीय सेवा एकाच ठिकाणी सुलभ व जलद पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर नागरिकांसाठी एक उत्तम संधी ठरणार असून प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करून घेता येणार आहेत.

संजय तायडे
बोरगाव मंजू : गावातील नागरिकांना महसुली व इतर शासकीय सेवा एकाच ठिकाणी सुलभ व जलद पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर नागरिकांसाठी एक उत्तम संधी ठरणार असून प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करून घेता येणार आहेत.
सदर शिबिराचे आयोजन शुक्रवार, दि. ८ मे रोजी सकाळी १० वाजता परशुराम नाईक विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार रणधीर सावरकर राहणार असून, खासदार अनुप धोत्रे हे विशेष उपस्थिती म्हणून सहभागी होणार आहेत. तसेच उपविभागीय अधिकारी (अकोला) शरद जावळेकर व तहसीलदार कुणाल झाल्टे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या शिबिरामध्ये नागरिकांना विविध महत्त्वाच्या सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामध्ये ७/१२ व ८-अ उतारे काढणे व दुरुस्ती, उत्पन्न, रहिवासी व जात प्रमाणपत्रे, डिजिटल स्वाक्षरी सुविधा, जमीन व नोंदणी संदर्भातील मार्गदर्शन, विविध शासकीय योजनांची माहिती तसेच विद्यार्थ्यांसाठी आवश्यक कागदपत्रे आदी सेवांचा समावेश आहे.
ग्रामस्थांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा व आपली प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करून घ्यावीत, असे आवाहन मंडळ अधिकारी हरिहर निमकर्डे यांनी केले आहे.

