Mahabreaking

[breaking_news]

Speeding car: बाभुळगाव जहागीरजवळ भरधाव कारची दुचाकीला धडक; अकोल्यातील युवक गंभीर जखमी

Speeding car: राष्ट्रीय महामार्गावरील श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वळणाजवळ भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना १९ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ११ वाजताच्या दरम्यान घडली. अपघातानंतर घटनास्थळी चारचाकी वाहनाची तुटलेली नंबर प्लेट आढळून आल्याने अज्ञात चारचाकीने दुचाकीस्वाराला धडक दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Speeding car

  महामार्गावर भीषण अपघात; घटनास्थळी चारचाकीची तुटलेली नंबर प्लेट, युवक रुग्णालयात

आगाखान पठाण

अकोला : राष्ट्रीय महामार्गावरील श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वळणाजवळ भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना १९ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ११ वाजताच्या दरम्यान घडली. अपघातानंतर घटनास्थळी चारचाकी वाहनाची तुटलेली नंबर प्लेट आढळून आल्याने अज्ञात चारचाकीने दुचाकीस्वाराला धडक दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जखमी युवक विजय वसंतराव पंडितकर, रा. डाबकी रोड, गल्ली क्रमांक २, अकोला, हे दुचाकी क्रमांक एमएच ३० बीजे ४९७० वरून अकोल्याच्या दिशेने जात होते. दरम्यान, बाभुळगाव जहागीरजवळ राष्ट्रीय महामार्गावर श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या वळणाच्या परिसरात त्यांच्या दुचाकीला चारचाकी वाहनाने धडक दिल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीस्वार रस्त्यावर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी मदतीसाठी धावलेल्या बाभुळगाव येथील युवकांनी तत्काळ जखमीला मदत केली आणि उपचारासाठी अकोला येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अपघातस्थळी एमएच ३० एएफ ०४८१ क्रमांकाची तुटलेली नंबर प्लेट आढळून आली आहे. त्यामुळे संबंधित क्रमांकाच्या चारचाकी वाहनानेच दुचाकीला धडक दिली असावी, असा संशय व्यक्त होत आहे. मात्र, अपघात नेमका कसा घडला आणि संबंधित वाहन कोणते होते, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

जखमी विजय पंडितकर यांच्या जवळील आधारकार्डवरून त्यांची ओळख पटल्याची माहिती मिळाली आहे. या अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला आहे. अपघातानंतर संबंधित चारचाकी वाहन घटनास्थळावरून निघून गेले असल्याचा संशय असून, पोलिसांकडून वाहनाचा शोध घेतला जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top