Mahabreaking

[breaking_news]

A massive sea :पालखी मार्गावर लाखो भाविकांचा अलोट जनसागर; ‘गण गण गणात बोते’चा जयघोष

A massive sea :संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त खामगाव ते शेगाव मार्गावर बुधवारी लाखो भाविकांचा अलोट जनसागर उसळला. श्रींच्या पालखीचे बुधवारी पहाटे खामगाव येथील नॅशनल हायस्कूल परिसरातून शेगावकडे प्रस्थान झाले. त्यापूर्वी मंगळवारीच खामगाव शहरासह परिसरातील आबालवृद्ध भाविकांनी मोठ्या संख्येने पायी वारी करीत शेगाव गाठले. ‘गण गण गणात बोते’च्या जयघोषाने संपूर्ण पालखी मार्ग दुमदुमून गेला.

massive

  खामगाव-शेगाव पालखी मार्ग भक्तिसागरात न्हाऊन निघाला; भाविकांची विक्रमी गर्दी

गजानन तिडके 

खामगाव : संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त खामगाव ते शेगाव मार्गावर बुधवारी लाखो भाविकांचा अलोट जनसागर उसळला. श्रींच्या पालखीचे बुधवारी पहाटे खामगाव येथील नॅशनल हायस्कूल परिसरातून शेगावकडे प्रस्थान झाले. त्यापूर्वी मंगळवारीच खामगाव शहरासह परिसरातील आबालवृद्ध भाविकांनी मोठ्या संख्येने पायी वारी करीत शेगाव गाठले. ‘गण गण गणात बोते’च्या जयघोषाने संपूर्ण पालखी मार्ग दुमदुमून गेला.

massive

पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. त्यामुळे पालखी सोहळा सुरळीत पार पडण्यास मदत झाली. ठिकठिकाणी पोलीस आणि स्वयंसेवक गर्दीचे नियोजन करताना दिसून आले.

भाविकांच्या सुविधेसाठी विविध सामाजिक संस्था, उद्योग आणि व्यापारी संघटनांनी पुढाकार घेतला. महाराजा मसाला उद्योगाच्या वतीने पालखी मार्गावर ठिकठिकाणी २४ अस्थायी स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली. याशिवाय अनेक ठिकाणी भाविकांसाठी चहा, नाश्ता, फराळ, भोजन तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आरोग्याची काळजी घेत विविध ठिकाणी औषधोपचाराची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली.

massive

केमिस्ट अॅणन्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने भाविकांना आवश्यक औषधांचे वितरण करण्यात आले. वसंत महाराज अन्नकुटी येथेही भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. महाराष्ट्र अर्बन परिवाराच्या वतीने ऋषी जाधव, माउली परिवाराच्या वतीने ज्ञानेश्वर जाधव तसेच शरदशेठ अग्रवाल यांनी श्रींच्या पालखीचे उत्साहात स्वागत केले.

पालखी शेगावात पोहोचताच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. भक्तिभाव, जयघोष आणि उत्साहाच्या वातावरणात पालखीचे यथोचित स्वागत करण्यात आले.

massive

कामगार मंत्र्यांनी केली श्रींच्या पालखीवर पुष्पवृष्टी

सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस येथे राज्याचे कामगार मंत्री अॅ्ड. आकाश फुंडकर यांनी श्री गजानन महाराजांच्या पालखीवर पुष्पवृष्टी करून पालखीचे स्वागत केले. यावेळी भाविकांनी मोठ्या उत्साहात ‘गण गण गणात बोते’चा जयघोष केला. पालखी सोहळ्यात सहभागी भाविकांच्या भक्तिभावामुळे परिसर भक्तिमय झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top