Signs of a drought : सन २०२६-२७ च्या खरीप हंगामातील बुलढाणा जिल्ह्याची सुधारित पैसेवारी जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे. जिल्ह्यातील एकूण १ हजार ४२० गावांपैकी सर्वच गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी नोंदविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात ५० पैशांपेक्षा अधिक पैसेवारी असलेले एकही गाव नसल्याचे सुधारित आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्याची सरासरी पैसेवारी अवघी ४२ पैसे असल्याने खरीप हंगामातील पीक परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित झाले आहे.

खरीप हंगामाची स्थिती चिंताजनक; बुलढाणा जिल्ह्याची सरासरी पैसेवारी अवघी ४२ पैसे!
बुलढाणा : सन २०२६-२७ च्या खरीप हंगामातील बुलढाणा जिल्ह्याची सुधारित पैसेवारी जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे. जिल्ह्यातील एकूण १ हजार ४२० गावांपैकी सर्वच गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी नोंदविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात ५० पैशांपेक्षा अधिक पैसेवारी असलेले एकही गाव नसल्याचे सुधारित आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्याची सरासरी पैसेवारी अवघी ४२ पैसे असल्याने खरीप हंगामातील पीक परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित झाले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, तालुकानिहाय गावांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. बुलढाणा तालुक्यात ९८, चिखली १४४, देऊळगाव राजा ६४, मेहकर १६१, लोणार ९१, सिंदखेड राजा ११४, मलकापूर ७३, मोताळा १२०, नांदुरा ११२, खामगाव १४६, शेगाव ७३, जळगाव जामोद ११९ आणि संग्रामपूर तालुक्यातील १०५ गावांचा समावेश आहे. या सर्व १ हजार ४२० गावांची सुधारित पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी नोंदविण्यात आली आहे.
तालुकानिहाय सरासरी सुधारित पैसेवारीमध्ये बुलढाणा तालुका ३१ पैसे, चिखली ४० पैसे, देऊळगाव राजा ४२ पैसे, मेहकर ४५ पैसे, लोणार ४६ पैसे, सिंदखेड राजा ४२ पैसे, मलकापूर ४६ पैसे, मोताळा ४६ पैसे, नांदुरा ३८ पैसे, खामगाव ४१ पैसे, शेगाव ४६ पैसे, जळगाव जामोद ४३ पैसे आणि संग्रामपूर ४६ पैसे अशी नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये खरीप हंगामाची पैसेवारी ५० पैशांच्या आत असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. याबाबतची माहिती अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी दिली.

