Mahabreaking

[breaking_news]

Shramanera Training Camp :वाडेगावात श्रामणेर प्रशिक्षण शिबीरास प्रारंभ, ३० शिबिरार्थी सहभागी

Shramanera Training Camp : विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व ज्योतीराव फुले यांची जयंती तथा वैशाख पौर्णिमा निमित्य सिद्धार्थ नगर वाडेगाव मध्ये बौद्ध उपासक उपासिका यांच्या सयुक्त विद्यमानाने सिध्दार्थ नगरच्या श्रमदानातून १० दिवसीय श्रामणेर शिबीराला २२ एप्रिल रोजी संयकाळी ८ वाजता ३० दारकांना दिक्षा देण्यात आली.

Shramanera Training Camp

राहुल सोनोने

वाडेगाव :- विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व ज्योतीराव फुले यांची जयंती तथा वैशाख पौर्णिमा निमित्य सिद्धार्थ नगर वाडेगाव मध्ये बौद्ध उपासक उपासिका यांच्या सयुक्त विद्यमानाने सिध्दार्थ नगरच्या श्रमदानातून १० दिवसीय श्रामणेर शिबीराला २२ एप्रिल रोजी संयकाळी ८ वाजता ३० दारकांना दिक्षा देण्यात आली.

बदलत्या युगात तरुण मंडळी मोबाईल मध्ये धुंद झालेले दिसत आहेत धम्माला गती देउन देशात समता, स्वातंत्रता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी धम्म संस्काराचे नितांत गरज भासत आहे. त्या निमित्ताने वाडेगाव येथील सिद्धार्थ नगर मध्ये विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले तसेच बुद्ध पौर्णिमेनिमित्त दहा दिवसीय श्रामनेराचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातून ३०  लोकांनी धम्मदीक्षा घेऊन धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी बुद्ध भिक्षूचे जीवन परिधान केले.  तर बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाकरिता या शिबिराच्या माध्यमातून एक चळवळ निर्माण करण्याचे कार्य सुद्धा बोलले जात आहे. शिबिराचे उपाध्याय पूज्य भदंत धम्मसार ( बुध्दीस्ट सेमीनरी ) यानी श्रामणेर दिक्षा विधी संपन्न केली. यावेळी परिसरातिल बौद्ध उपासक / उपासिका तथा बालक मोठ्या संख्ये उपस्थित होते.  शिबीराची सांगता बुद्ध पौर्णिमा १ मे रोजी होणार आहे .या दहा दिवस धम्मदेशनाकरिता भदंत बी संघपाल, भदंत विनयपालजी, भदंतसुमंगल जी भदंत महानामाजी भन्ते डॉ. आनंद, भन्ते रठ्ठपाल श्रामनेर संघाला १० दिवस धम्म देसना देणार आहेत .या परिसरातील बौद्ध उपासक उपासिका तसेच बहुजन समाजातील बुद्धिजीवी वर्गातील लोकांना या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन सिद्धार्थ नगरवासीयांकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top