Sharad Dhage : भारतीय जनता पक्षाच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन शरद ढगे यांची भारतीय जनता पार्टी अकोला महानगर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

पक्षकार्याची दखल; शरद ढगे यांच्यावर भाजपची मोठी जबाबदारी
अकोला : भारतीय जनता पक्षाच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन शरद ढगे यांची भारतीय जनता पार्टी अकोला महानगर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
लोकसभा, विधानसभा तसेच नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या प्रसंगी आमदार रणधीर सावरकर यांच्यासह सौ. सुहासिनीताई धोत्रे, जयंतभाऊ मसने, विजयराव अग्रवाल, किशोरभाऊ मांगटे पाटील, संतोषभाऊ शिवरकर, सौ. शारदाताई खेडकर, माधव मानकर, संजय गोटफोडे, प्रशांत अवचार, अॅड. देवाशीष काकड तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

