Mahabreaking

[breaking_news]

Severe heat wave :8 ते 12 मार्चदरम्यान उष्णतेची तीव्र लाट; नागरिकांनी घ्यावी विशेष काळजी

Severe heat wave :विदर्भासह अकोला जिल्ह्यात येत्या काही दिवसांत उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. 8 ते 12 मार्च 2026 या कालावधीत तापमानात झपाट्याने वाढ होण्याचा अंदाज असून बाळापूर तहसीलसह परिसरात उष्णतेची तीव्रता वाढू शकते. या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि आरोग्य विभागाने नागरिकांना विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

Severe heat wave

जाकीर अहेमद 

बाळापूर : विदर्भासह अकोला जिल्ह्यात येत्या काही दिवसांत उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. 8 ते 12 मार्च 2026 या कालावधीत तापमानात झपाट्याने वाढ होण्याचा अंदाज असून बाळापूर तहसीलसह परिसरात उष्णतेची तीव्रता वाढू शकते. या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि आरोग्य विभागाने नागरिकांना विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, या काळात दुपारच्या वेळी तापमान 38 ते 40.9 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. अचानक वाढणाऱ्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी विशेषतः दुपारच्या वेळेत अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

आरोग्य तज्ज्ञांनीही उष्णतेपासून बचावासाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. दुपारी 12 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत कडक उन्हात बाहेर जाणे टाळावे. दिवसभर पुरेशा प्रमाणात पाणी पिऊन शरीर हायड्रेट ठेवावे. लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी, गमछा किंवा कापड ठेवून उन्हापासून संरक्षण करावे, असेही तज्ज्ञांनी सुचविले आहे.

तसेच कडक उन्हात दीर्घकाळ श्रमाचे काम टाळावे. तब्येत बिघडल्यास किंवा उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशासनाचे म्हणणे आहे की नागरिकांनी वेळेवर खबरदारी घेतली, तर उष्णतेच्या लाटेचा परिणाम मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतो. त्यामुळे येत्या काही दिवसांत नागरिकांनी स्वतःची आणि कुटुंबियांची विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top