Mahabreaking

[breaking_news]

Varshatai Ugalmugle :स्त्री शक्तीचा सन्मान हीच त्यांच्या कार्याची ओळख : वर्षाताई उगलमुगले

Varshatai Ugalmugle :जागतिक महिला दिनानिमित्त अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने साखरखेर्डा येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी महिलांच्या कार्याची दखल घेत समाजात त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

Varshatai Ugalmugle

जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा गौरव; साखरखेर्ड्यात सन्मान सोहळा

साखरखेर्डा : जागतिक महिला दिनानिमित्त अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने साखरखेर्डा येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी महिलांच्या कार्याची दखल घेत समाजात त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जागदरी येथील आदर्श महिला सरपंच वर्षाताई शंकरराव उगलमुगले होत्या. अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले की, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे जशी महिलांची महत्त्वाची भूमिका असते, तशीच महिलांच्या यशामागेही कुटुंबातील पुरुषांचा सहभाग असतो. स्त्री शक्तीचा सन्मान करणे हीच त्यांच्या कार्याची खरी पावती आहे. जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करण्याचे कार्य पत्रकारांनी केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी साखरखेर्डा येथील सरपंच सौ. ज्योती अमित जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, महिलांना घरकामासोबत सामाजिक, राजकीय आणि सेवाक्षेत्रातही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. शिक्षण, आरोग्य, अंगणवाडी सेवा, आशा वर्कर्स अशा विविध क्षेत्रांत काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तरीही महिला न डगमगता समाजासाठी कार्यरत राहतात. त्यामुळे अशा महिलांचा सन्मान होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी आरोग्य सेविका प्रमिला कोवे, आशा वर्कर्स ज्योती दिलीप इंगळे तसेच डॉ. वैष्णवी राठोड यांनीही मनोगत व्यक्त केले. कोरोनासारख्या कठीण काळात आरोग्य व सेवाक्षेत्रातील महिलांनी केलेल्या कामाची समाजाने दखल घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात डॉ. भाग्यश्री श्रीनिवास खेडेकर, वर्षाताई उगलमुगले,  ज्योती जाधव,   पुनम महेंद्र पाटील, डॉ. वैष्णवी राठोड, डॉ. निलीमा देशमुख, डॉ. जयश्री शेळके, प्रमिला कोवे, शांता वाघ, कविता इंगळे यांच्यासह अनेक कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष प्रतापराव मोरे, जिल्हा सचिव डी. एन. पांचाळ, औषध निर्माता डॉ. गोपाल मानतकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल परिहार, शंकरराव उगलमुगले आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन खंडारे, सचिव डी. एन. पांचाळ, प्रसिद्धी प्रमुख समाधान सरकटे आणि राधेश्याम बंगाळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन खंडारे यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top