Mahabreaking

[breaking_news]

Service milestone ceremony : सेवापूर्ती सोहळा ठरला समाजसेवेचा उत्सव; महाआरोग्य शिबिरात हजारोंनी घेतला लाभ

Service milestone ceremony : साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषध निर्माता म्हणून तब्बल ४० वर्षे सेवाभावाने कार्य करणारे गोपाल मानतकर यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नेत्रतपासणी, रक्तदान, मोफत औषधोपचार, तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी आदी सुविधांचा हजारो रुग्णांनी लाभ घेतला.

Service milestone ceremony

 ‘सर्वांच्या आपुलकीचा माणूस म्हणजे गोपाल मामा’; सेवाभावाचा गौरव, आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

साखरखेर्डा : साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषध निर्माता म्हणून तब्बल ४० वर्षे सेवाभावाने कार्य करणारे गोपाल मानतकर यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नेत्रतपासणी, रक्तदान, मोफत औषधोपचार, तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी आदी सुविधांचा हजारो रुग्णांनी लाभ घेतला.

यावेळी प्रमुख उपस्थित असलेले केंद्रीय आयुष व आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले, “या जगात अनेकांना भाऊ, दादा किंवा काका अशा उपाधी मिळतात; मात्र ‘मामा’ ही उपाधी माणसाच्या आपुलकीतून मिळते. गोपाल मानतकर यांनी सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि रुग्णांप्रती असलेल्या आत्मीयतेमुळे संपूर्ण परिसरात ‘गोपाल मामा’ म्हणून ओळख निर्माण केली आहे. सेवानिवृत्तीनंतरही सेवावृत्ती जपत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करून त्यांनी समाजाप्रती असलेली बांधिलकी सिद्ध केली आहे.”

गोपाल मानतकर यांच्या सेवापूर्तीनिमित्त मित्रमंडळ, भूमिपुत्र वैद्यकीय मदतकक्ष, बुलढाणा आणि केंद्रीय आयुष मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव होते. उद्घाटक म्हणून माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, युवासेना नेते योगेश जाधव, अनिल नावंदर, डॉ. निलेश गावंडे, श्रीनिवास खेडेकर आणि शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मायाताई म्हस्के उपस्थित होते.

‘सेवाभाव जोपासणारे लोक मोजकेच’ – डॉ. राजेंद्र शिंगणे

माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी गोपाल मानतकर यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, “मानतकर कुटुंबाची समाजसेवेची परंपरा जुनी आहे. त्यांचे वडील डॉ. सुखदेव मानतकर हे वाहतुकीच्या सुविधा नसतानाही घोड्यावरून दुर्गम भागात जाऊन रुग्णसेवा करत असत. त्याच सेवाभावाचा वारसा गोपाल मानतकर यांनीही जपला. प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध निर्माता म्हणून कार्यरत असताना त्यांनी रुग्णांना केवळ औषधेच दिली नाहीत, तर आत्मीयतेची वागणूकही दिली. त्यामुळे ‘गोपाल मामा आहेत, म्हणजे सर्व काही ठीक आहे,’ असा विश्वास नागरिकांच्या मनात निर्माण झाला.”महाआरोग्य शिबिरात नेत्रतपासणी, मोफत चष्मे वाटप, रक्तदान शिबिर, विविध आजारांची तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन तसेच गरजू रुग्णांना मोफत औषधोपचार करण्यात आले. हजारो नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुनील रिंढे, सोमेश्वर इंगळे, शरद इंगळे, शरद मानतकर यांच्यासह मित्रमंडळाने विशेष परिश्रम घेतले. शिबिराच्या आयोजनात युवासेना नेते योगेश जाधव यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैष्णवी सिनगारे यांनी केले, तर सूत्रसंचालन अजीम नवाज राही यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top